01:35pm | Apr 19, 2021 |
मुंबईः कोरोना संकटाची वाढत्या तीव्रतेने महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात करोना संसर्गाचा कहर आणखी वाढला असून रविवारी 68 हजार 631 नवीन करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल 503 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही एका दिवसातील राज्यातील सर्वात मोठी आकडेवारी आहे. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात दर तीन मिनिटाला एका रुग्णाचा करोनामुळं मृत्यू होत असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.
करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं चित्र आहे. करोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने कलम 144 लागू केलं आहे. परंतू महाराष्ट्रात करोनाची परिस्थिती अधिक चिंताजनक होत चालली आहे. दर 3 मिनिटाला एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तर, एका तासात दोन हजारांहून अधिक जणांना करोनाची लागण होत आहे.
करोनाची दुसरी लाट अधिक संसर्गजन्य आहे. करोनाच्या या दुसर्या लाटेत ग्रोथ रेटही वाढत आहे. मुंबईत करोनाचा ग्रोथ रेट वाढून 1. 53 टक्के इतका झाला आहे. ग्रोथ रेट वाढत असला तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कलावधी व मृत्यू दरात काही प्रमाणात दिलासा मिळतोय.
या सार्या चिंताजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |