11:37pm | Oct 19, 2020 |
सातारा : जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल मावळत्या एसपींचा कित्ता गिरवत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ऍक्शन मोडमध्ये आले असून जिल्ह्यातील टॉप टेन गुन्हेगारांची यादी तयार असून मोक्का, एमपीडीए, तडीपारीसह प्रतिबंधात्मक कारवाई सुरुच ठेवण्याचा इरादा त्यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केला.
सातारा जिल्ह्याचा पोलिस अधीक्षक पदाचा चार्ज घेतल्यानंतर दहा दिवसानंतर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्याचा आढावा घेत पोलिस ठाण्यानिहाय टॉप टेन गुन्हेगारांची यादी तयार केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, दहा दिवसांमध्ये जिल्ह्यात पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केल्या असून हा सिलसिला सुरुच राहणार असल्याचा दावाही त्यांनी केल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
येथील पोलिस मुख्यालयाच्या पाठीमागील हॉलमध्ये नुतन पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी प्रथमच पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे, एलसीबीचे पोनि सर्जेराव पाटील उपस्थित होते.
एसपी अजयकुमार बन्सल म्हणाले, सातारा जिल्ह्याचा दहा दिवसांपूर्वी चार्ज घेतला. या दहा दिवसांमध्ये जिल्ह्याची माहिती घेतली आहे. यामध्ये राजकीय, सांस्कृतिक तसेच कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. लॉ ऍन्ड ऑर्डर अबाधित ठेवण्यासाठी आपण आग्रही राहणार असून जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या इन्चार्जना तशा सूचना दिल्या आहेत. सध्या दुर्गादेवी त्यानंतर दसरा, दिवाळी असे महत्वपूर्ण सण, उत्सव आहेत. आपण जोपर्यंत सातार्यात काम करणार आहे तोपर्यंत मजबूत काम रहावे यासाठी काही प्लॅन तयार केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यात शांतता कायम राखण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यानिहाय जे टॉप टेनचे गुन्हेगार, टोळ्या आहेत त्यांची यादी तयार केली असून त्याची संख्या 1153 जणांची आहेे. तसेच ज्या व्यक्तीवर दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत अशांची माहिती घेतली असता त्यांची संख्या 2766 आहे. या सर्वांची माहिती घेवून येत्या काही दिवसांपासून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईस सुरुवात केली जाणार आहे.
दरम्यान, गेल्या दहा दिवसांमध्ये झालेल्या कारवाईंची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, कराड येथे आयपीएलवर सट्टा लावणारी टोळी जेरबंद केली, तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडले, घरफोडीचे 8 तर जबरी चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत. शाहूपुरी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी एटीएम मशीनमधून पैसे चोरणार्या व 3 राज्यात वॉन्टेड असणार्या टोळीला अटक केली, सातारा तालुका पोलिसांनी ट्रक चोरणार्याला अटक केली, बेकायदा बंदूक बाळगल्याप्रकणी दोघांना अटक करुन त्यांच्याकडून 3 रिव्हॉल्व्हर, 3 जिवंत काडतुसे जप्त केली, वॉन्टेड असणार्या 5 संशयितांना ताब्यात घेतले. महिलांबाबत दाखल असणार्या गुन्ह्यातील 2 गुन्हे उघडकीस आले असून निर्भया पथकाद्वारे जनजागृती केली जात आहे. भरोसा सेल मार्फत ज्येष्ठ नागरिक, बालके यांच्या समस्यांचे निराकरण केले जात असल्याचेही एसपी अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |