02:46pm | Nov 30, 2020 |
ढेबेवाडी: राज्यात सत्तेसाठी तयार झालेल्या तिघाडीच्या कारभारामुळे जनतेची पिळवणूक होत आहे. या तिघाडीच्या कारभाराविरोधात सर्वसामान्यांना राग आहे. तोच राग या मतदानाद्वारे बाहेर पडणार असून नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार निवडणूक जिंकणार हे अटळ सत्य आहे, असा भाजपाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य भरत पाटील यांनी येथे व्यक्त केला.
भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील उमेदवार संग्राम देशमुख व जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ तळमावले (ता.पाटण) येथे नुकत्याच झालेल्या मेळाव्यात भरत पाटील बोलत होते. यावेळी विक्रमबाबा पाटणकर, कविता कचरे, रामभाऊ लाहोटी, फत्तेसिंह पाटणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना भरत पाटील म्हणाले की, पदवीधर व शिक्षक मतदार सुज्ञ असल्याने सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा हा निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनाच होईल. कुणी कितीही आघाड्या आणि वल्लग्ना करू द्यात, सुज्ञ मतदार तिघाडीला नाकारणारच आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. ‘पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची संपूर्ण विकासाकडे वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रातील जनतेचा कौल भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीला असताना ऐनवेळी भाजपला डावलून सत्तेवर आलेल्या तीन पक्षांच्या आघाडीला जनतेने आता चांगलेच ओळखले आहे. जनतेच्या मतांचा अनादर करून तयार झालेल्या अशा प्रकारच्या आघाड्या फार दिवस टिकत नसतात, हा इतिहास आहे. त्यामुळे होवू घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये जरी तिघांचे संख्याबळ दिसत असले तरी हा दिखावाच ठरणार आहे, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. कविता कचरे यांनी आभार मानले.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |