02:59pm | Aug 13, 2020 |
सातारा: साताऱ्यात आता अकरावी प्रवेश प्रक्रिया १४ ऐवजी १८ ऑगस्टपासून सुरू होणार असून तसे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिली. इयत्ता दहावीची गुणपत्रके १७ ऑगस्टपासून मिळणार असल्यामुळे या प्रवेश वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
राजेश क्षीरसागर म्हणाले, इयत्ता १० वी आणि १२ वी २०२० ची गुणपत्रिका वितरणाचे नियोजन करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्ससिंगद्वारे बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये गुणपत्रिका वितरणाबाबत सर्व विभागीय मंडळाचा प्रचलित कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला. चर्चेनंतर राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गुणपत्रके वितरणाबाबत चर्चा करण्यात आली. गुणपत्रिका विभागीय मंडळाकडून शाळांना वितरित करण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी असेल. विभागीय मंडळांनी इयत्ता दहावी मार्च २०२० परीक्षेची गुणपत्रके शाळांना दि. १४ व १७ ऑगस्ट रोजी वितरीत करावीत. दि. १७ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार व सोयीनुसार शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व नियमांचे व सूचनांचे पालन करून गुणपत्रक वितरण करावे. याबाबत सर्व शाळांना परिपत्रकाअन्वये कळवण्यात यावे. विद्यार्थ्यांना विशिष्ट तारखेला गुणपत्रक घेऊन जाण्याबाबत आग्रह धरू नये. गुणपत्रिका वितरणासाठी वितरण केंद्रावर स्थायी लिपिक व शिपाई पाठविण्याबाबत कार्यवाही करावी, या पुणे येथील राज्य मंडळाच्या सचिवांनी दिलेल्या सूचनेवर कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान साताऱ्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया १४ ऐवजी १८ ऑगस्टपासून राबविण्यात येणार असून त्याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दि. १८ ते २४ ऑगस्टदरम्यान फॉर्म देणे व स्विकारणे. दि. २४ ते २६ या कालावधीत प्रवेश अर्जाची छाननी तपासणी व गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करणे. दि.२८ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निवड यादी व प्रतिक्षा यादी सूचना फलकांवर लावणे. दि.२९, ३१ दि. ९ व १० सप्टेंबर रोजी निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. दि.४ ते ५ रोजी प्रवेश शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देणे. दि. ७ ते ८ या दोन दिवसात दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश शिल्लक असतील तर मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे. दि. ९ व १० रोजी रिक्त राहिलेल्या जागांवर एटीकेटी धारक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, असे सुधारित वेळापत्रकाचे स्वरूप राहणार आहे, अशी माहिती राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |