सातारा : कोरोनाच्या पाश्वभूमीवर वीज वितरण कंपनीने 300 युनिटच्या आतील वीज वापर असलेल्या जिल्ह्यातील सर्व घरगुती ग्राहकांची तीन महिन्यांची वीज बिले माफ करावीत, जिल्ह्यात सर्कलनिहाय दुष्काळ जाहीर करावा, एफआरपी कायद्याचा भंग करणार्या कारखान्यांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, तालुकाध्यक्ष धनंजय महामुलकर, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, देवानंद पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोरोना काळातील घरगुती वीज बिले शासनाने माफ करावीत. जिल्ह्यातील सर्कलनिहाय पर्जन्यमापकाची नोंद घेऊन सर्कलनिहाय दुष्काळ जाहीर करण्यात यावा, 2019-20 च्या गळीत हंगामात थकीत ऊसबिले तातडीने द्यावीत, तसेच एफआरपी कायद्याचा भंग करणार्या कारखान्यांवर कारवाई करावी, नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपये अनुदान तातडीने द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. येत्या 17 ऑगस्टपासून किसनवीर कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरासमोर सर्व नियम व अटी पाळून ऊसबिल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिला. याप्रसंगी रमेश पिसाळ, नितीन यादव, बापू साळुंखे, प्रमोद जगदाळे, संजय जाधव, विजय चव्हाण, महादेव डोंगरे, दत्ता पाटील, रवींद्र घाडगे, प्रमोद घाडगे, दादासाहेब जाधव आदी उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |