12:33pm | Nov 25, 2022 |
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धा वालकर (वय २७ ) हत्येप्रकरणी मोठं वक्तव्य केलं आहे. अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची चिन्ह आहेत. श्रद्धा वालकर प्रकरणात ज्याने तिची हत्या केली त्याला कमीत कमी कालावधी कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष हे प्रयत्न करतील, असं अमित शहा म्हणाले.
श्रद्धा वालकर प्रकरणावर आपले लक्ष आहे. ज्याने कोणी श्रद्धाची हत्या केली आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळेल, अशी ग्वाही मी देशाच्या जनतेला देतो, असं अमित शहा म्हणाले. श्रद्धा वालकर प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तिचा मित्र आफताब पुनावाला याला ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्याची पोलीस कोठडी पूर्ण होईल, असं शहा यांनी सांगितलं. या प्रकरणात दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलिसांमध्ये समन्वयाचा कुठलाही अभाव नाही, नाही असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
'त्या' जबाबदार पोलिसांची होणार चौकशीकाही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकरचे एक पत्र समोर आले आहे. या पत्राशी दिल्ली पोलिसांचा काही संबंध नाही. श्रद्धाने हे पत्र महाराष्ट्रातील एका पोलीस ठाण्याला लिहिलं होतं. आफताबने शरीराचे तुकडे-तुकडे करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती, असं श्रद्धाने त्या पत्रात म्हटलं आहे. श्रद्धाने पत्र देऊनही संबंधित पोलिसांनी पुढे कारवाई का केली नाही, याची चौकशी करण्यात येईल. त्यावेळी महाराष्ट्रात आमचे सरकार नव्हते. यामुळे या प्रकरणी जो कोणी जबाबदार असेल त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं.
आशिष शेलारांनी व्यक्त केली होती शंका
श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे. श्रद्धा वालकरने पत्र लिहिलं होत तरीही पुढे कारवाई झाली नाही. या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर शेलार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. आफताबकडून जीवाला धोका आहे असं पत्र श्रद्धाचं पोलिसांना लिहिलं मग त्यावेळी कारवाई का नाही?, असं आशिष शेलार म्हणाले होते. यासोबत श्रद्धाच्या हत्येप्रकरणी तत्कालीन सत्ताधारी पक्षांनी निषेध का केला नाही? असा सवालही शेलारांनी केला होता. तसंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्रद्धाच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली होती. श्रद्धाचं पत्र आपल्यापर्यंत आले आहे. हे पत्र अतिशय गंभीर आहे. या प्रकरणी त्यावेळी कारवाई का केली गेली नाही, याची चौकशी केली जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.गृहमंत्री अमित शहा यांनी चीनला ठणकावले, 'देशाची एक इंचही जमीन बळकावू देणार नाही'
काय आहे श्रद्धा वालकर प्रकरण?
आफताबने श्रद्धाची गळादाबून हत्या केल्याचा आरोप आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने तिचा मृतदेह दिल्लीतील घरातल्या ३०० लिटरच्या फ्रीजमध्ये जवळपास तीन आठवडे ठेवला होता. यानंतर श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करून आफताब हा ते तुकडे गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीच्या परिसरात रात्रीच्या वेळी वेगवगेळ्या भागात फेकत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी तपास केला जात आहे.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |