09:28pm | Sep 22, 2021 |
कराड : राष्ट्रीय महामार्ग, भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचा लोकार्पण आणि विविध रस्ते कामांचा कोनशीला अनावरण समारंभ रस्ते वाहतुक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार दुपारी कराड नजीकच्या द फर्न हाॅटेल येथे होणार आहे. 5 हजार 971 कोटी रूपयांचे 403 कि.मी.लांबीचे रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. ना.गडकरी कराडातील दोन कार्यक्रमांनाही हजेरी लावणार आहेत.
या समारंभात कागल-सातारा (127.15 कि.मी.) या रस्त्याचे सहापदरी करणे तर मसूर फाटा, इंदोली, काशिळ (3.50 कि.मी.) रस्ता अपघात प्रवण क्षेत्र सुधारणा, मिरज शहरांतर्गत रस्त्यांची एक वेळ सुधारणा, आजरा-आंबोली- संकेश्वर विभागाचे उन्नतीकरण, कळे-कोल्हापूर विभागाचे उन्नतीकरण, घाटमाता ते हेळवाक (13.10 कि.मी.) विभाग मजबुतीकरण या कामांचा कोनशिला अनावरण समारंभ होणार आहे.
नागज ते मुचंडी विभागाचे उन्नतीकरण व तासगाव ते शिरढोण विभागाचे उन्नतीकरण कामांचा लोकार्पण समारंभ होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या सेंट्रल रस्ते निधीअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये डिचोली- हेळवाक-वहाटळ-शेणोली स्टेशन (4 कि.मी.) रस्त्याची विभाग सुधारणा, पाटण- तारळे-काशिळ (19 कि.मी.) रस्त्याची सुधारणा, वेल्हे -जेजुरी -लोणंद-सातारा रस्त्याची चौपदरीकरणासाठी सुधारणा, शिरसावडी-शेणवडी-खेराडे रस्त्याची सुधारणा, मांडवे- नागठाणे- नांदगाव रस्त्याची सुधारणा, फलटण- आसू-तावशी (28 कि.मी.) या जिल्ह्यांच्या सीमा रस्त्यांची सुधारणा, बुध- निढळ- पेडगाव वडूज रस्त्याची सुधारणा, फलटण-उपलवे-कुळकजाई रस्त्याची सुधारणा या कामांचा समावेश आहे
या समारंभास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, खा.संभाजीराजे छत्रपती, खा. उदयनराजे भोसले, मंत्री शंभूराज देसाई, खा. संजय मंडलिक, खा.संजय पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ.मोहनराव कदम, खा.धैर्यशील माने, आ. अरुण लाड, आ. गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत, आ.शिवेंद्रराजे भोसले, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. जयंत आसगावकर, आ.पी एन पाटील, आ. दीपक चव्हाण, आ.सुरेश खाडे, आ.प्रकाश आबिटकर, आ. मानसिंगराव नाईक, आ. सुमनताई पाटील, आ. राजू आवळे, आ. महेश शिंदे, आ.विक्रमसिंह सावंत, आ. ऋतुराज पाटील, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान ना.नितिन गडकरी कराड शहरातील दोन संस्थांच्या छोटेखानी कार्यक्रमांना हजेरी लावणार असून एका हाॅस्पिटल व चचेगाव येथिल प्रकल्पासही भेट देणार आहेत.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |