09:12pm | Apr 16, 2021 |
फलटण : सासकल जन आंदोलन समितीने केलेल्या आंदोलनानंतर नूतन सरपंच उषाताई फुले यांनी पुढाकार घेऊन गौण खनिजांचा चोरट्या मार्गाने होणारा वाळू उपसा थांबवण्यासाठी वाळू बंदीचा ठराव घेतला. त्यांच्या या निर्णयाचे जन आंदोलन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, अवैधरित्या गौण खनिजाची होणारी लूट व शेतकर्यांच्या शेतजमिनीला होणार धोका याचा विचार करून सासकल जन आंदोलन समितीच्या वतीने वाळू बंदीचा ठराव घेण्यासंबंधी अर्ज देण्यात आला होता. शासन निर्णयानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 14(ग), कलम 398(क) अन्वये अवैध वाळू उपसा झाल्यास सरपंच व महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 कलम 9 अन्वये पोलीस पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याचाच आधार घेऊन ग्रामपंचायत सासकलचे सरपंच यांना दि. 27/2/2021 रोजी व 26/2/2021 रोजी सासकल, भाडळी खु. व भाडळी बु. चे पोलीस पाटील हनुमंत सोनवलकर यांना निवेदन देण्यात आले होते. यासंबंधी पोलीस पाटील व सरपंच यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मोहन नामदेव मुळीक, मा.सरपंच लक्ष्मण गणपत मुळीक, रघुनाथ गणपत मुळीक, राजेंद बाबुराव फुले, राजेंद्र वसंत सावंत, राजेंद्र धोंडिबा घोरपडे, सुरज मुळीक, शंकर आडके, महेश मदने, जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव हरिबा मुळीक, सल्लागार भानुदास दिनकर घोरपडे, उपाध्यक्ष विनायक नारायण मदने व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने दि. 9 मार्च 2021 रोजी झालेल्या मासिक सभेत वाळू बंदीचा ठराव घेतला. यासंबंधी वाळू बंदी संबंधी सूचक म्हणून मोहनराव नामदेव मुळीक यांनी सूचना मांडली, तर ग्रामपंचायत सदस्य हणमंतराव गंगाराम मुळीक यांनी अनुमोदन दिले. अवैध वाळू उपशासंबंधी सासकल, भाडळी बु. व भाडळी खु. चे पोलीस पाटील यांनी पुढाकार घेतला. याबद्दल जन आंदोलन समितीच्या वतीने पोलीस पाटलांचे विशेष आभार मानण्यात आले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |