सातारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गावगुंडासारखे, गांजाड्या नानांचा धिक्कार असो अशा घोषणा देत आक्रमक होऊन भाजपा कार्यकर्त्यांनी पोवई नाका येथे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार यांच्या नेतृत्वाखाली नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून टीका केली. त्या पार्श्वभूमीवर सातारा येथे आज भाजपाने आंदोलन केले. शहराध्यक्ष विकास गोसावी म्हणाले , नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारहाण करण्याची आणि शिव्या देण्याची धमकी दिली. हा प्रकार अंगलट आल्यानंतर त्यांनी आपण पंतप्रधान नव्हे तर एका गावगुंडाबद्दल बोलल्याची सारवासारव केली. त्यानंतर एक कथित गावगुंड पत्रकारांसमोर आला. त्या कथित गावगुंडाने पत्रकारांशी बोलताना जे सांगितले त्याच प्रकारे नाना पटोले आज बोलले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत, हे धक्कादायक आहे. आम्ही सर्व भाजपा कार्यकर्ते याचा निषेध करतो. मोदी आडनावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या घाणेरड्या टिप्पणीमुळे त्यांना न्यायालयासमोर जाब द्यावा लागला. नाना पटोलेही त्यांच्या नेत्याच्या मार्गावरून चालले आहेत. पटोले यांनी कारवाईला तयार रहावे, नंतर 'तो मी नव्हेच' असा पळपुटेपणा करू नये, असा इशारा त्यांनी दिला
पोलीस प्रशासनाकडे नाना पटोले यांची तक्रार करूनही अजूनही एफआयआर दाखल झाला नाही. पोलीस प्रशासनाने कोणाचाही बंधनात न राहता काम करावे आणि एफआयआर दाखल करावा.
नाना पटोले यांनी दारुड्या सारखे जे वक्तव्य केले त्यामध्ये त्यांनी महिलांचाही अपमान केला आहे. महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जर राष्ट्राबद्दल प्रेम असेल, पंतप्रधानपदाबद्दल त्यांच्या बद्दल त्याच्या मनात किंमत असेल तर त्यांनी नाना पटोले यांना ताबडतोब अटक करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नानांना त्यांची जागा दाखवतील आणि होणाऱ्या परिणामास महाविकास आघाडी जबाबदार असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा चिटणीस विजय गाढवे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, युवा मोर्च्या जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश शहा, आरोग्य सेवा जिल्हाध्यक्ष अप्पा कदम, सिने कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, वैशाली टंकसाळे, प्रशांत जोशी, चिटणीस रवी आपटे, महिला मोर्च्या शहराध्यक्ष रीना भणगे, तालुकाध्यक्ष मोनाली पवार, ओबीसी युवती जिल्हाध्यक्ष वनिता पवार, शहराध्यक्ष मनीषा जाधव, युवा मोर्च्या शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, जेष्ठ नागरिक अध्यक्ष प्रकाशकाका शहाणे, ओ बी सी शहर उपाध्यक्ष अविनाश खार्शिकर, किरण माने, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवथरला नऊ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ |
आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार |
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |