01:23pm | Oct 24, 2020 |
अजित जगताप
सातारा: दुष्काळाची झळा अनुभवल्यानंतर सहा वर्षानंतर खटाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच पंधरा दिवसांपूर्वी अंबवडे- गोरेगाव रस्त्यावरील पूल (जलसेतु) कोसळल्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली. आता या पडलेल्या पुलाच्या काही भागात रात्रीच्यावेळी अवैधरित्या वाळू चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
खटाव तालुक्यामध्ये गावोगावी दळणवळणाची सुविधा व संपर्क येण्यासाठी 1996 साली तत्कालीन आमदार भाऊसाहेब गुदगे यांच्या पुढाकाराने अंबवडे- गोरेगाव दरम्यान पुला (जलसेतु) ची उभारणी करण्यात आली. त्यानंतर सदरचा रस्ता राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. सदरच्या जलसेतु बाबत त्यावेळी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे 2016 रोजी सदर जलसेतूच्या भिंत कोसळली होती.
आता अतिवृष्टीमध्ये बनपुरी नजिक बंधारा फुटल्याने पहाटे अंबवडे -गोरेगाव पूलाचा (जलसेतु) पिंपरी हद्दीतील भाग कोसळून वाहून गेला. पंधरा दिवसाने नदी पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आता काही वाळू माफियांनी आता कोसळलेल्या पुलाखालचे मोठे दगड बाजूला काढून त्याठिकाणी साचलेल्या वाळू रात्रीच्या वेळी चोरून घेऊन जात असल्याची चर्चा सुरू झाली. स्थानिक पातळीवर वाळू मुळे वादावादी नको म्हणून या बाबत उघडपणे कोणीही भाष्य करीत नाही.
अंबवडे ते गोरेगाव या जलसेतु मुळे पिंपरी, गोरेगाव, धोंडेवाडी, मरडवाक, कदमवाडी परिसरातील ग्रामस्थांचा संपर्क येऊ लागला. परंतु गेली पंधरा दिवस या पुलाचा काही भाग कोसळल्या मुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पंधरा दिवसांपूर्वी बंधारा फुटल्यानंतर पाण्याच्या वाढत्या प्रवाहाने पिंपरी हद्दीतील पुलाचा भाग पहाटेच्या सुमारास कोसळला त्यामुळे दुर्घटना घडली नाही. पंधरा दिवस होऊन सुद्धा या पुलाच्या देखभाल दुरुस्ती साठी प्रयत्न होत नसल्याची खंत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. शासकीय पातळीवर जावळी सातारा तालुक्यात विरोधी पक्षनेते यांनी पाहणी केली तर फलटण तालुक्यात केंद्रीय राज्य मंत्री येऊन गेले. पण माण- खटावला विरोधी पक्षाचे वरिष्ठ नेते का येऊ शकले नाहीत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्या महसूल विभाग हा शेती नुकसान पंचनाम्यात गुंतल्याने वाळू चोरीचे वाढू लागले आहे. प्रश्न वाळू चोरीचा नसून मानवी चुकीमुळे आर्थिक व जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूल विभागाने वाळू चोरीचा ‘डायनोसोर’ बंदिस्त करणे गरजेचे आहे. यापूर्वी अवैधरित्या वाळू व्यवसाय करणारी ’ ‘पाल’ पकडली जाते मात्र ‘डायनोसोर’ ला मोकाट सोडले जाते. याबाबतही लक्ष वेधून घेतले आहे. अन्यथा याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात नदीकाठच्या पुलानजिक वाळूसाठी पुलाचे नुकसान करून शासकीय निधी वाया घालवला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, असा प्रकार घडत असेल तर पुराव्यानिशी तक्रार आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |