09:35pm | Jan 25, 2022 |
सातारा : माणचे सुपुत्र व आसाम राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नितीन खाडे यांनी निवडणुकीसंबंधी राबविलेल्या नाविन्यपूर्ण यशस्वी उपक्रमांची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने माण तालुक्याच्या व सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राचा देशपातळीवर होणारा गौरव प्रत्येकासाठीच अभिमानास्पद वाटत आहे.
कोव्हिड19चा प्रादुर्भाव लक्षात घेता आसाम राज्याच्या विधानसभा निवडणूका शांततेत व भितीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे काम यशस्वी पार पाडले. कारण अासाम मध्ये अतिरेकी, जातीय अाणि वांशिक हिंसाचाराचा मोठा इतिहास आहे. निवडणूकीच्या काळात अतिरेकी हिंसाचाराच्या घटना पूर्वी अनेक वेळा घडल्या आहेत. या सर्व घटनांचा सखोल अभ्यास करून एक वेगळा "आसामचा निवडणूक पॅटर्न" तयार करून तो यशस्वी देखील करून दाखविला. याचे फलित म्हणजे मतदानाची टक्केवारी जवळपास 0.5 ने वाढली.
निवडणूक कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देऊन सोशल मिडियाचा प्रभावी वापर केला.
या दरम्यान 80 वर्षावरील वयोवृद्ध शारीरिक विकलांग असणाऱ्या मतदारांना पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली.
करोना कालावधीत निवडणूक अर्ज भरताना सार्वजनिक मेळावे, मिरवणुकीस मनाई करून प्रचारा दरम्यान रोड शो, मोटार सायकल रॅली काढण्यास सक्तमनाई केली. घरोघरी प्रचारासाठी 5 व्यक्तींनाच परवानगी दिली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरुध्द व सोशल मिडियावरुन अाणि प्रत्यक्ष शांतता व सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या घटनांना वेळीच पायबंद घालून कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबवून पायबंद घालण्यात आला. पोलिस आणि प्रत्यक्ष निवडणूक यंत्रणेत समन्वय राखण्यात आला. असे काही विविध प्रयोग देखील केले. याचा फायदा म्हणजे भयमुक्त वातावरणात मतदार स्वयंस्फूर्तीने बाहेर पडले. मतदानाची टक्केवारी वाढली.
कोविड सह अनेक आव्हाने समोर असताना देखील नितीन खाडे यांनी अत्यंत नियोजनपूर्वक अाणि काटेकोरपणे निवडणूक यंत्रणा राबवली. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करत असताना निवडणूक निष्पक्ष रितीने पार पडावी, जास्तीत जास्त मतदारांनी कोविड च्या अनुषंगाने नियमांचे पालन करत मतदानाचा हक्क बजावावा यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांच्या कामाची दखल भारत निवडणूक आयोगाने घेतली असून त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये नितीन खाडे यांना गौरविण्यात येणार आहे.
-----------------------------------------
▪️ बीड जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना राबविलेला "आयुर्मंगलम" प्रोजेक्ट आजही त्यांच्याच नावाने ओळखला जातो. याची दखल त्यावेळी तात्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी घेतली.
-----------------------------------------------
राष्ट्रीय पुरस्कारासाठी याच ठरल्या उल्लेखनीय गोष्टी-
▪️14 फेब्रुवारी ते 6 एप्रिल 2021 या कालावधीत कोविड 19 महामारीच्या काळातही एकूण 9 लाख 15 हजार 993 नवीन मतदार मतदार यादीत जोडले गेले.
▪️कोविडचा प्रार्दुभाव असूनही 2019 च्या लोकसभा विधानसभा निवडणूकीसाठी मतदान 0.5 टक्के ने वाढले.
▪️मतदान कर्मचाऱ्याचा कोविड संबंधित मृत्यू झाला नाही आणि हिंसाचारात देखील झाला नाही.
▪️सर्व मतदान कर्मचाऱ्यांचे लसीकरण मार्च पुर्वी पुर्ण केले.
▪️निवडणूका निष्पक्ष आणि सुरक्षित पार पाडली गेली.
▪️ऑनलाइन यंत्रणा व सोशल मिडियाचा प्रभावी वापर....
निवडणूककामी नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोव्हिड चा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांना ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |