सातारा : हिवाळा हा खाण्यापिण्यासाठी उत्तम मानला जातो. या हंगामात भरपूर ताज्या हिरव्या पालेभाज्या हि बाजारामध्ये मिळतात, ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये पालक ही पालेभाजीची महत्वाची आहे. पालकमध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात आणि शरीराला यातून ताकद मिळते. पालकमध्ये 23 कॅलरीज, 91 टक्के पाणी, 2.9 ग्रॅम प्रथिने, 3.6 ग्रॅम कार्ब, 2.2 ग्रॅम फायबर आणि 0.4 ग्रॅम फॅट असते. याशिवाय व्हिटॅमिन A, C, K1, फॉलिक अॅसिड, लोह आणि कॅल्शियम देखील पालकामध्ये आढळते.
डोळ्यांसाठी फायदेशीर
पालकमध्ये झेक्सॅन्थिन आणि ल्युटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामध्ये कॅरोटीनॉइड्स असतात, जे डोळ्यांना होणार्या कोणत्याही नुकसानापासून संरक्षण करतात. अनेक अभ्यासांनुसार, झेक्सॅन्थिन आणि ल्युटीन डोळ्यांना मोतीबिंदूपासून वाचवतात. पालकामध्ये आढळणारे व्हिटॅमिन 'ए' श्लेष्मल त्वचा टिकवून ठेवण्यास मदत करते, जे दृष्टीसाठी आवश्यक आहे.
कर्करोगाची शक्यता कमी
आठवड्यांमध्ये दिसेल फरक कर्करोग प्रतिबंधित करते पालकमध्ये MGDG आणि SQDG सारखे घटक आढळतात. त्याच्यामुळं कर्करोगाच्या वाढीचा वेग मंदावतो. एका अभ्यासानुसार, ही संयुगं ट्यूमरचा आकार कमी करण्याचे काम करतात. पालक पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाची शक्यता देखील कमी करतो.
याशिवाय पालकमुळं ब्रेस्ट कॅन्सरपासूनही बचाव होतो. प्राण्यांवर केलेल्या एका अभ्यासानुसार, पालक कर्करोगाच्या गाठीदेखील कमी करण्यास मदत करतो. पालकामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे कॅन्सरशी लढण्यास मदत करतात.
रक्तदाबावर फायदेशीर
पालकमध्ये भरपूर नायट्रेट असते, ज्यामुळे रक्तदाबाची पातळी संतुलित राहते आणि हृदयविकारापासून बचाव होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पालक खाल्ल्याने रक्तदाबाची पातळी प्रभावीपणे कमी होते. त्यामुळे हृदय निरोगी राहते. पालकामध्ये पोटॅशियम भरपूर असते आणि सोडियमचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे रक्तदाबाच्या रुग्णांनी पालक जरूर खाल्ला पाहिजे.
हिमोग्लोबिन वाढवतो
ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे. त्यांनी आपल्या आहारात पालकाचा समावेश करावा. पालकामध्ये भरपूर प्रमाणात फोलेट असतत. जे लाल रक्तपेशी वाढवण्यासाठी आवश्यक मानले जाते.
पालक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. आरोग्य तज्ज्ञ हिवाळ्यात अधिकाधिक पालक खाण्याचा सल्ला देतात. त्यात केवळ बीटा-कॅरोटीनच समृद्ध नाही, तर त्यात सर्व आवश्यक अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. त्यात व्हिटॅमिन 'सी' देखील भरपूर आहे, जे शरीराला संक्रमणाशी लढण्यास मदत करतत.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |