02:59pm | Mar 21, 2022 |
कराड : राज्यातील सर्व पतसंस्थांना यापूर्वी एनपीएच्या संदर्भात १२ हप्त्यांचा नियम होता. मात्र, आता शासनाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार १२ हप्त्यांचा निकष बदलून ९ हप्त्यांचा करण्यात आला आहे. कोरोनामुळे अजून लोकांचे उद्योग व्यवसाय सुरू झालेले नाहीत. त्यामुळे वसूलीत अडचणी येत असून परिणामी, पतसंस्था पुन्हा अडचणीत येतील. त्यामुळे पतसंस्थांना गतवर्षीप्रमाणेच १२ हप्त्यांचे निकष करावेत, अशी मागणी राज्य पतसंस्थांचे असोसिएशनच्या वतीने राज्याचे सहकार व पणनमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र स्टेट को-आँप डेव्हलपमेंट अँन्ड वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपोडे बुद्रुकचे संस्थापक व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे, उपाध्यक्ष कृष्णा शेलार, संचालक प्रभाकर साबळे, शिवकृपा पतपेढी लि. मुंबईचे उपाध्यक्ष वसंतराव चव्हाण, विजय ग्रा.बि. सहकारी पतसंस्थांचे अध्यक्ष विश्वासराव धुमाळ, विजय जाधव, जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
याप्रसंगी सहकारमंत्र्यांनी पतसंस्थांच्या सर्व अडचणी आस्थेपूर्वक जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांना दिले. पतसंस्थांच्या बाबतीत सहकारमंत्र्यांची नेहमी सकारात्मक भुमिका असते. ते सहकारमंत्री झाल्यापासून दोन वर्षांत आम्ही पतसंस्थांचे जे प्रश्न त्यांच्याकडे मांडले, ते त्यांनी सोडविले आहेत. पतसंस्थांच्या एनपीएच्यासंदर्भात मी निश्चित सकारात्मक प्रयत्न करेन व पतसंस्थांना न्याय मिळवून देईन, असे आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिले असल्याची माहितीही असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ लेंभे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य बिगरशेती कृषी सहकारी पतसंस्था नियमक मंडळ, पुणे यांनी काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व प्रकारच्या पतसंस्थांना एनपीए (अनुत्पादक जिंदगी) चे गतवर्षीच्या १२ हप्त्यांचे निकष बदलून ते ९ हप्त्यांचे करण्यात आले आहेत. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे लहान-मोठे व्यावसायिक, सामान्य ग्राहक खूप अडचणीत आला आहे. त्यामुळे पतसंस्थांना कर्जवसुलीत खूप अडचणी येत आहेत.
यामुळे पतसंस्थांना एनपीएचे निकष १२ हप्त्याचेच ठेवल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल. तसेच ६ ते ९ हप्ते थकीत असणारी कर्जे उत्पादक जिंदगी म्हणून दर्शवली आहेत. अशा कर्जखात्यांच्या बाबतीत ६ महिन्यापेक्षा जास्त व ९ महिन्यापेक्षा कमी कालावधीचे व्याज; जे उत्पन्नात घेतले असेल, तर त्यापोटी निव्वळ नफ्यातून किमान २५ टक्के किंवा जेवढे व्याज उत्पन्नात घेतले आहे त्यापैकी जे कमी असेल तेवढ्या रकमेची तरतुद संस्थेच्या ३१ मार्च २०२२ अखेरच्या निव्वळ नफ्यातून करावी, ही अट टाकली आहे. यामुळे संस्थांना नफा होण्यास मोठी अडचण येणार आहे. त्यामुळे ही अट रद्द करावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |