09:34pm | May 26, 2022 |
सातारा : सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या शाहूनगर परिसरामध्ये लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर भोसले यांनी दिली. हा उपक्रम लोकवर्गणीतून साकारला जाणार आहे.
हद्दवाढीच्या भागासाठी राज्य शासनाने खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल 48 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पायाभूत सुविधांसाठी शाहूनगर सारख्या भागांमध्ये साधारण दहा कोटी रुपये वाट्याला येतील, असा अंदाज आहे. सातारा नगरपालिकेने या संदर्भातील विकास आराखडा बनवला आहे. तरीसुद्धा ही कामे सुरू होऊन प्रत्यक्ष मार्गी लागणे पर्यंत बराच कालावधी जाणार असल्याने काही सुविधा या लोकवर्गणीतून करण्याचे जय सोशल फाउंडेशनने ठरवले आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भोसले आणि शाहूनगर परिसरातील 21 कॉलन्यामधील नागरिक स्वतःहून पुढे आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सर्वांनी होकार दिला असून येथील अजिंक्य रिक्षा स्टॉप परिसरात प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. या लोकवर्गणीचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे.
हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर याच धर्तीवर एसटी कॉलनी परिसर, जगताप वाडी परिसर आणि शाहूनगरच्या अंर्तगत काही भागांमध्ये अशा पाच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. जय सोशल फाउंडेशन ने यापूर्वीही पायाभूत सुविधा तसेच पाणीपुरवठा या प्रश्नांमध्ये जाणीवपूर्वक लक्ष घातले आहे.
या सीसीटीव्ही उपक्रमासंदर्भात बोलताना सागर भोसले म्हणाले की, सातारा शहराच्या हद्दवाढीमुळे नंतर ग्रामीण भागांचा विकास झपाट्याने होतो आहे. शाहूनगरमध्ये कधीही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व नागरिकांची सुरक्षितता राखली जावी याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. या सीसीटीव्हीचा कंट्रोल रूम एका सुरक्षित ठिकाणी केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार |
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु |
शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम |
मृत कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 24 तासांत 1 कोटीचा निधी |
उद्धव ठाकरे च्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण |
शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर |
भाजपच्या महिला व युवक संपर्क प्रमुखांची पनवेल येथे बैठक संपन्न |
किर्लोस्कर पॉवर टिलर्सच्या माध्यमातून शेतीमध्ये घडवून आणत आहे क्रांती |
मलकापूर नगरपंचायतीतील निधी अपहार प्रकरणाची होणार चौकशी |