05:32pm | Dec 26, 2020 |
दहिवडी : सातारा पंढरपूर रस्त्या नजिक असणार्या (ता.खटाव) निढळ येथील अनधिकृत आर.एम.सी प्लांट पुन्हा सुरू करण्यात आला आहे. 10 ते 12 दिवसांपूर्वी तहसीलदार किरण जमदाडे यांनी हा प्लांट सील केला होता. या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी तसेच विना परवाना खुदाई केली होती. तसेच याला परवानगी नसल्याचे कारण देत हा प्लांट सील करण्यात आला होता. मात्र आज पुन्हा हा प्लांट सुरू करण्यात आला आहे. याला नक्की पाठिशी कोण घालत आहे? असा अत्ता प्रश्न उपस्थित राहत आहे. उपविभागीय अधिकारी यांनी माण-खटाव तालुक्यातील सर्व अनधिकृत खडी क्रशर सील केले आहेत. मग हा अनधिकृत खडी साठा आणि आर.एम.सी प्लांट पुन्हा सुरू का केला..? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्लांट प्रकरणी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
माण- खटाव तालुक्यातील शेतकर्यांना एक ब्रास वाळू असो की मुरूम यांच्या वरती तात्काळ कारवाईचे आदेश देऊन गुन्हे दाखल करणारे अधिकारी या प्रकरणी मूग गिळून गप्प कसे..? असा प्रश्न सर्व सामान्य जनता विचारत आहेत. मग निढळ (ता.खटाव) येथे उभारण्यात आलेले सातारा-पंढरपूर महामार्गालगत खडी क्रेशर व आर एम सी प्लांट हे अनधिकृत असून त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या परवानग्यामध्ये फार मोठा घोटाळा आढळून आला होता. तसेच या ठिकाणी लाखो ब्रास खडी व वाळू तयार करण्यात आलेली त्याचा साठा कशा प्रकारे करण्यात आला आहे, याची नोंद महसूल विभागात देखील नाही.
गेली चार वर्षे यांचा अनधिकृत कारभार चालू होता. त्याची माहिती तत्कालीन प्रांताधिकारी यांना देण्यात आली होती, प्रांताधिकार्यांनी तहसीलदारांना संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले होते. तरीही तो खडी क्रशर चालूच होता. तत्कालीन तहसीलदार अर्चना पाटील या कारवाईकडे दुर्लक्ष केले होते. मात्र नवीन तहसीलदार यांनी यावरती कारवाई करत हा क्रशर तसेच प्लांट बंद केला होता. मग अचानकपणे दहा दिवसात असे काय झाले की रात्रीत हा प्लांट सुरू करण्यात आला आहे.
अनेक दिवसापासून खटाव तालुक्यातील निढळ भागात अनधिकृत आर.एम.सी. प्लांट व खडी क्रशर उभारण्यात आले होते. याच्याबद्दल अनेक संघटनांनी वेळोवेळी तक्रारी त्याचबरोबर आंदोलन करून देखील शासनाचा महसूल बुडवण्याचे काम संबंधित ठेकेदार व प्लांन्ट धारकांनी केले होते. तरी देखील त्या त्या भागातील तलाठी, सर्कल अधिकारी यांचे या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. खानपट्टा, प्रदूषण नियंत्रण मंडळ परवानगी तसेच वन विभागाच्या परवान्यांचे देखील मोठे गौडबंगाल यांनी उभे केले होते. अधिकारी, क र्मचारी यांना हाताशी धरून या परवानग्या घेतल्या गेल्या होत्या. सर्वसामान्य शेतकरी लोकांना मुरूम, माती उचलत असताना तहसीलदार प्रांतअधिकारी कारवाई करत आहेत मग त्यांना हा एवढा मोठा काळा बाजार कसा काय दिसून येत नाही..? या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनीच लक्ष देणे गरजेचे आहे. एकाला वेगळा न्याय आणि धन दांडग्याना मोकळीक का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |