08:55pm | Sep 26, 2021 |
सातारा : कराड तालुक्यात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून करवडी ता. कराड गावच्या हद्दीत चौघांनी एकाच्या डोळ्यात चटणी टाकत त्यास लाकडी दांडक्याने, तलवारीने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.
शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून याबाबतची फिर्याद नवनाथ रामचंद्र पवार वय 36, रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली आहे. याप्रकरणी चौघांवर कराड ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
रमेश रामचंद्र पवार वय 40 रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा असे खून झालेल्याचे नाव आहे. तर दिपक शरद इंगळे, संदिप सुभाष इंगळे आणि अनोळखी दोघेजण (नावे समजू शकली नाहीत) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार फिर्यादी नवनाथ व त्याचा भाऊ मयत रमेश हे दोघेजण फिरून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होते. दिपक इंगळे हा त्यांच्याच गावात राहत असून गेल्या 10 ते 15 दिवसापासून त्याची पत्नी व रमेश पवार यांचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्या कारणावरून दिपक व रमेश यांच्यात दोन दिवसापूर्वी किरकोळ वाद झाला होता.
शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रमेश हा गावातील लखन बालेखान मुलाणी याच्या बोलेरो गाडीतून भाजीपाला आणण्यासाठी कराड मार्केट येथे गेला. त्यावेळी त्याच्यासोबत गावातील गाडीचालक लखन मुलाणी, अमर नेटके, दत्तात्रय पवार असे होते. रात्री 10 च्या सुमारास भाजीपाला खरेदी करून आर्वी येथे येण्यासाठी ते निघाले असता कराड-पुसेसावळी रोडने जात असताना वाघेरी फाट्यानजीक पाठीमागून आलेल्या तवेरा गाडीने ओव्हरटेक करून बोलेरो गाडीच्या पुढे गाडी आडवी मारून दिपक इंगळे, संदिप इंगळे व अनोळखी दोघांनी रमेश यास गाडीतून बाहेर ओढून पिशवीतून आणलेली मिरची पुड रमेशच्या डोळ्यात टाकून दिपकने तवेरा गाडीतून आणलेल्या तलवार सारख्या हत्यार्याने रमेशवर वार केले. त्याचबरोबर संदिप व अन्य दोघांनी रमेश यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात रमेशचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयितांनी पोबारा केला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी रमेशचा भाऊ नवनाथ पवार याने कराड ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |