09:13pm | Jun 26, 2021 |
फलटण : मराठा व ओबीसी समाजाचे आरक्षण जावे या हेतूने राज्य शासनाने वेंधळा कारभार केला असल्यानेच आरक्षण न्यायालयात टिकले नाही. आरक्षण रद्द होण्याचे हे पाप या तीन तिघाडी आणि काम बिघाडी सरकारचे असल्याचा आरोप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करताना मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी मोठा जनसंघर्ष उभा करण्याचा इशारा दिला.
ओबीसींचे राजकीय आरक्षण आबाधित ठेवण्यासाठी माढा लोकसभा मतदार संघातील फलटण येथे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, अनुप शहा, अभिजित नाईक निंबाळकर, फलटण भाजप तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, तुकाराम शिंदे, उषा राऊत, सिराज शेख, अमित रणवरे, डॉ प्रवीण आगवणे, रियाज इनामदार, माजी नगरसेवक राजेश शिंदे, जाकीर मनेर, बाळासाहेब ननवरे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा राज्य शासनाला इम्पेरिकल डाटा देण्याच्या सूचना व पत्र दिले होते. परंतु आघाडी शासनाने याकडे सूड उगवण्यासाठी पूर्णपणे दुर्लक्ष केले. ओबीसी विरोधात कोर्टात याचिका दाखल करणारे यांच्या सरकार मधील काँग्रेस पदाधिकारी आहेत. याचा अर्थ कोणाला आरक्षण नकोय हे स्पष्ट होत असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
शासनाने ओबीसी चा त्वरीत इम्पेरिकल डाटा देऊन आरक्षण करून घ्यावे तसेच मराठा समाजाची पुनर्विचार याचिका दाखल करून मराठा समाजालाही सरकारला न्याय द्यावा लागणार असल्याचे खा.नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगताना मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठा जनसंघर्ष उभारणार असल्याचा इशारा देऊन आघाडी सरकारमुळेच आरक्षण गेल्याचे जोरदार टीकास्त्र सोडले. तीन पक्षांचे सरकार हा महाराष्ट्राला शाप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |