10:21pm | Mar 28, 2023 |
सातारा : मागील काही महिन्यांपासून सातारा जिल्ह्यात फायरिंगच्या घटना असताना आता कराड येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या दहा जणांकडून देशी बनावटीची तब्बल 14 रिव्हॉल्व्हर, 22 काडतुसे आणि कोयता पोलिसांनी जप्त केला आहे.
मागील काही दिवसामध्ये घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी बेकायदा रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश सातारा जिल्ह्यातील पोलिसांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कराड येथील राजमाची ते विटा रस्त्यावर जनाई मळाई मंदिराजवळ असलेल्या शेतात काही इसम जमले असून ते ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती दि. 28 मार्च रोजी पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कराड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकाने संबंधित परिसरात जात आरोपींना ताब्यात घेतले व यांच्याकडून 9 लाख 11 हजार रुपये किमतीच्या देशी बनावटीच्या तब्बल 14 पिस्टल, 22 जिवंत काडतुसे, कोयता अन् मिरची पूड असा असा मुद्देमाल जप्त केला असून
सनी उर्फ गणेश शिंदे रा. ओगलेवाडी ता. कराड, अमित हनुमंत कदम रा. अनंतवाडी ता. कराड, अखिलेश सुरज नलावडे रा. गजानन हाउसिंग सोसायटी. कराड, धनंजय मारुती वाटकर रा. सैदापूर ता. कराड, वाहिद बाबासो मुल्ला रा. विंग तालुका कराड, रिजवान रज्जाक नदाफ रा. मलकापूर ता. कराड, चेतन शाम देवकुळे रा. बुधवार पेठ ता. कराड, बजरंग सुरेश माने, रा. बुधवार पेठ ता. कराड, हर्ष अनिल चंदवाणी रा.मलकापूर कराड व तुषार पांडुरंग शिखरे रा. हजारमाची ता. कराड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यावर कराड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपविभागीय अधिकारी रणजीत पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस उपाधीक्षक अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक भगवानराव पाटील, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, उदय दळवी, पोलिस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, अतिश घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अमोल माने, मुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, निलेश काटकर, मोहन पवार, प्रवीण कांबळे, गणेश कापरे, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाने, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, धीरज महाडिक, पृथ्वीराज जाधव, प्रवीण पवार, वैभव सावंत, गणेश कापरे, संभाजी साळुंखे, पंकज बेसके, नितीन येळवे, कुलदीप कोळी, अमित वाघमारे, सज्जन जगताप, सचिन निकम, सागर बर्गे यांनी केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |