04:21pm | Oct 03, 2020 |
कोरेगाव: भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी आपल्या वाढदिवस कोरोना रुग्णांना पौष्टिक आहार तसेच औषेध देऊन साजरा केला आहे. रमेश उबाळे यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे मत आ.महेश शिंदे यांनी व्यक्त करून उबाळे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
आ.महेश शिंदे यांनी उभारलेल्या काडसिद्धेश्वर महाराज कोविड सेंटरला वाढदिवसानिमित्त रमेश उबाळे यांनी फळे, बिस्कीट, धान्य तसेच औषधे आ.शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत सुपूर्त केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.शिंदे यांनी रमेश उबाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आ.शिंदे पुढे म्हणाले, रमेश उबाळे उत्तम उद्योजक तसेच हरहुन्नरी, सामाजिक जाणिव, सामाजिक भान असणारा कार्यकर्ता आहे. सर्व काही समाजासाठी झोकून देण्याची त्यांची वृत्ती आहे. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर धुमधडाक्यात, उत्साहात वाढदिवस साजरा करणार्या रमेश उबाळे यांनी कोरोनाच्या संकटात मात्र कोव्हीड सेंटरमधील रुग्णांना पौष्टिक आहार, औषेध देऊन वाढदिवस साजरा केला आहे. उबाळे यांचा हा आदर्श इतर कार्यकर्त्यांनी घेऊन कोरोनवर अधिकचे काम करावे.
राहुल बर्गे म्हणाले, रमेश उबाळे हे उत्तम कार्यकर्ते, नेते आहेतच परंतु एक चांगले मित्रही आहेत. मैत्रीला जगणारा हा माणूस आहे. कोरोना रुग्णांना आहार वाटप करून वाढदिवस साजरा करणेचा त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे.
सत्काराला उत्तर देताना रमेश उबाळे म्हणाले, खरे तर कोरोनाच्या संकटात आपण वाढदिवस साजरा करणार नव्हतो. परंतु माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम करणार्या मित्रांनी, कार्यकर्त्यांनी आग्रह केल्याने मी वाढदिवसाचा केक कापला परंतु याचवेळी आ.महेश शिंदे यांनी उभारलेल्या कोव्हीड सेंटरमधील कोरोना रुग्णांना आहार, औषधे वाटप करून वाढदिवस साजरा करण्याचे सर्वानुमते ठरले. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी स्वखर्चाने आ.महेशदादांनी कोव्हीड सेंटर उभे केले आहे. असे कोव्हीड सेंटर शासनालाही उभे करता आले नाही. आ.शिंदे यांचा हा सेवायज्ञ असून या यज्ञाची सध्या सर्वत्र चर्चा आहे यामध्ये आपणही खारीचा वाटा उचलला पाहिजे म्हणून आपण येथे आलो आहे.
यावेळी कोरेगाव तालुका भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, युवा मोर्चाचे कोरेगाव शहराध्यक्ष श्रीकांत बर्गे, वसीम इनामदार आदी उपस्थित होते. सर्वच उपस्थित कार्यकर्त्यांनी उबाळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |