09:54pm | Nov 24, 2022 |
सातारा : संभाजी ब्रिगेड सातारा यांच्या वतीने येत्या 27 नोव्हेंबर रोजी बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक येथे बिझनेस कॉन्फरन्स होणार असून यामध्ये इंपोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनचे संस्थापक अभिजीत शिंदे, मिटकॉनचे मुख्य व्यवस्थापक गणेश खामगळ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जनरल मॅनेजर राजेंद्र भिलारे व संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष व प्रसिद्ध व्यावसायिक अनिल देसाई, सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, सद्गुरु पॉलिमर्स कोरेगाव चे संस्थापक प्रशांत यादव यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
प्रदीप कणसे म्हणाले, मराठा समाजामध्ये व्यवसायाविषयी प्रचंड आस्था निर्माण करणे आणि मराठी तरुणांना व्यावसायिक न्यून मानसिकतेतून बाहेर काढणे याकरता संभाजी ब्रिगेडने आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ सुरू केली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 19 बिझनेस कॉन्फरन्स झाल्या आहेत. तरुणांना उद्योजकतेचे धडे देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध जिल्ह्यात बिझनेस कॉन्फरन्स घेतला जात आहे. अभिजीत शिंदे हे आपण निर्यात करू शकतो का? तर गणेश खामगळ हे कृषी व उद्योग व्यवसायातील संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. राजेंद्र भिलारे हे शासकीय योजना व कर्ज वाटप, तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या बिझनेस कॉन्फरन्सचा मराठी तरुणांनी विशेष लाभ घ्यावा, असे आवाहन प्रदीप कणसे यांनी केले आहे. यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, पुणे विभाग कार्याध्यक्ष गणेश चोरगे, सातारा जिल्हाध्यक्ष ( पूर्व ) अनिल जाधव, सातारा जिल्हाध्यक्ष पश्चिम शिवम कदम व समन्वयक पांडुरंग पवार उपस्थित होते.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |

खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |