01:03pm | Sep 22, 2020 |
बुध: शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक आर्थिक, मागास, वंचित घटकातील विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थी गुणवत्ता विकासाचा कार्यक्रम राबणारे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे हे शिक्षण क्षेत्रातील दिपस्तंभ आहेत, असे विचार गिरवी (ता.फलटण) केंद्राचे अभ्यासू उपक्रमशील केंद्रप्रमुख अनिल कदम यांनी काढले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण येथे प्राचार्य डॉ.रामचंद्र कोरडे यांचे सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
प्राचार्य डॉ.रामचंद्र कोरडे यांची बदली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळापुर (ता. माळशिरस जि.सोलापूर) येथे झाल्याने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण यांचे वतीने प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे यांचा सत्कार फलटण पंचायत समिती, फलटणचे गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांचे हस्ते व केंद्रप्रमुख अनिल कदम, जेष्ठ अधिव्याख्याता जितेंद्र साळुंखे, आदर्श शिक्षक गणेश तांबे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे होते. यावेळी सोशल डिस्टंसिंग, मास्क व सॅनटराईज तसेच आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी अनिल कदम पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात शिक्षण समृद्धी, ज्ञानरचनावाद, अध्ययन निष्पत्ती, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, अध्यायन स्तर निश्चिती, राष्ट्रीय ज्ञान संपादणुक चाचणी, मूल्यवर्धन उपक्रम, स्काउट गाईड यासारखे विविध उपक्रम प्राचार्य डॉ. कोरडे यांनी प्रभावी व यशस्वीपणे राबवले.
सत्कारास उत्तर देताना प्राचार्य डॉ.रामचंद्र कोरडे म्हणाले की, सातारा जिल्हा हा शैक्षणिक क्षेत्रात पुरोगामी असून येथे काम करताना सर्वाचे सहकार्य मिळाले. काम करत असताना कामाचा आनंद मिळाला. मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक लाभले, याचे समाधान मिळाले. यावेळी राजेंद्र रांजणे, दमयती कुंभार, किरण फाळके, गजेश तांबे, राणी पाटील, विद्या कदम, सतिश फरांदे, बुवा जितेंद्र साळुंखे यांची समयसूचक भाषणे झाली. राजश्री तिटकारे यांनी सूत्रसंचलन केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सुभाष बुवा यांनी केले. या कार्यक्रमास किरण शिंदे यानी तंत्रसाह्य केले. यावेळी सातारा जिल्ह्यातील विषय तज्ञ, साधन व्यकी, तंत्रज्ञ, ग्रंथपाल उपस्थित होते.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |