12:51pm | Oct 29, 2022 |
सुरत : गुजरात निवडणुकीबाबत आम आदमी पक्ष मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोणाला बनवणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. याबाबत आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी सुरत येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, 'जो आमचा मुख्यमंत्री उमेदवार असेल तोच गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री असेल, त्यामुळे आज आम्ही जनतेला विचारतो की तुमचा मुख्यमंत्री कोण असावा हे तुम्हीच सांगा'. जनतेचे मत जाणून घेण्यासाठी आपकडून क्रमांकही जारी केला आहे. तसेच लोक एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप संदेश पाठवू शकतात किंवा व्हॉइस संदेश देखील पाठवू शकतात आणि मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची निवड ईमेलद्वारे करू शकणार आहेत.
केजरीवाल म्हणाले की, 'लोकांना बदल हवा आहे आणि महागाई आणि बेरोजगारीपासून दिलासा हवा आहे. या लोकांनी 1 वर्षापूर्वी मुख्यमंत्री बदलले, आधी विजय रुपाणी साहेब होते, त्यांना बदलून भूपेंद्र पटेल साहेबांना का आणले? याचा अर्थ विजय रुपाणी यांच्यात काही गडबड होती का? त्याआधी विजय रुपाणी साहेबांना आणल्यावर जनतेला विचारले नाही आणि दिल्लीतून बसवायचे ठरवले. लोकशाहीत मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवते. तुम्ही ना 2016 ला विचारले, ना 2021 मध्ये. आम आदमी पक्षात आम्ही हे करत नाही, तुम्हाला मुख्यमंत्री कोण करायचे आहे हे जनतेला विचारून ठरवतो'.
यापुढे ते म्हणाले की, तुम्हाला आठवत असेल की, पंजाबमध्ये आम्ही मुख्यमंत्री कोण व्हावे, असे जनतेला विचारले होते, त्यानंतर सर्वांनी भगवंत मान साहेबांचे नाव प्रचंड बहुमताने घेतले, त्यानंतर जनतेच्या इच्छेनुसार आम्ही भगवंत मान यांच्या नावाची घोषणा केली होती. आता गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येणार आहे. अशा परिस्थितीत आमचा मुख्यमंत्री जो उमेदवार असेल तोच गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री असेल, म्हणून आज आम्ही जनतेला विचारतो की तुमचा मुख्यमंत्री कोण असावा ते सांगा. हा क्रमांक 3 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कार्यरत राहील आणि त्यानंतर 4 नोव्हेंबरला जो काही निकाल लागेल, तो गुजरातच्या जनतेला आपला पुढचा मुख्यमंत्री कोणाला बनवायचा आहे, हे ते जनतेसमोर ठेवतील.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |