08:18pm | Oct 02, 2022 |
पुसेगाव : कोरेगाव व माण विधानसभा मतदारसंघ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभा असून दोन्ही विधानसभा मतदारसंघातून बहुसंख्येने शिवसैनिक दसरा मेळव्याला शिवतीर्थावर उपस्थित राहणार आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे नवनिर्वाचीत जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी केले.
जाधव पुढे म्हणाले, शिवसेना आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा हे अतूट नाते असून यावर्षीही बहुसंख्येने निष्ठावान शिवसैनिक दसरा मेळाव्याला वाजत गाजत उपस्थित राहणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटणार आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेच्या १९६६ च्या स्थापनेपासून होत असलेला शिवतीर्थावरील दसरा मेळावा आजतागायत एक नेता, एक मैदान, एक विचार असाच होत आहे. हिंदुत्व आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला असून त्याच विचारधारेवर आजही शिवसेना ठाम असून कितीही वादळे आली तरी शिवसेना डगमगली नसून आत्मसन्मान आणि निष्ठेचा वारसा आजही जपला असून सद्यस्थितीत चालू राजकीय घडामोडीत गद्दारांच्या बंडातूनही शिवसेना निष्ठावान शिवसैनिकांच्या जीवावर पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आगामी काळात शिवसेना एकमेव पक्ष आहे जो महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देऊ शकतो.
दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने कोरेगाव आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही मतदारसंघात झालेल्या बैठकीत दसरा मेळावा जोशात साजरा करणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिकांना जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी पक्ष संघटना वाढी संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी कोरेगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख भानुदास कोरडे, उपजिल्हाप्रमुख दत्ताभाऊ नलावडे, कोरेगाव तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, खटाव तालुकाप्रमुख दिनेश देवकर, सातारा तालुकाप्रमुख रमेश बोराटे, कोरेगाव शहरप्रमुख अक्षय बर्गे, महिला आघाडीप्रमुख उज्वला भोसले व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |