01:40pm | Jun 24, 2021 |
नवी दिल्ली: पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर अनेक कारणांची मालिकाही सुरू झाली. परंतु यामुळे पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी विजेतेपद मिळण्यात अपयश आलं. सलग तिसर्यांदा भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धेत पराभव पत्करावा लागला आहे. अचूक रणनिती, संघातील खेळाडूंची योग्य निवड, प्रतिस्पर्ध्यांच्या कमकुवत बाजूंची माहिती आणि हवामानाचा अभ्यास करणे हे गुण न्युझीलंडच्या कर्णधाराने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याकडूनच घेतले परंतु भारतीय कर्णधाराला ते जमले नाही. त्यामुळे या स्पर्धेचा निकाल म्हणजे कर्णधाराचा पराभव असल्याचे अधोरेखित झाले आहे.
लॅथम आणि कॉन्वे लवकर माघारी परतल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या डावात 5 आणि दुसर्या डावात 2 बळी घेणार्या न्यूझीलंडच्या काईल जेमीसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
सर्वाधिक 12 कसोटी जिंकल्यानंतरही त्यांना अंतिम सामन्यात मात्र जिंकता आलं नाही. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडूनच पराभव पत्करावा लागला होता. तर त्याआधी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केलं होतं. दरम्यान, भारताने हा सामना 10 चेंडूत गमावल्याचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.
दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघाच्या पराभवाचं खापर पावसावर फोडलं आहे. विराट म्हणाला की, पहिल्या दिवसाचा खेळ पावसाने वाया गेला होता. त्यानंतर जेव्हा खेळ सुरु झाला तेव्हा पुन्हा जम बसवणं कठीण होतं. आम्ही फक्त तीन विकेट गमावल्या. जर पावसाचा व्यत्यय आला नसता तर आमच्या आणखी धावा झाल्या असत्या. असे असले तरी कर्णधारपदाचाच हा पराभव झाला असल्याचे नाकारता येणार नाही.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |