05:07pm | May 27, 2022 |
मुंबई : कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेला आर्यन खान याला अमली पदार्थ नियंत्रण कक्ष अर्थात एनसीबीकडून क्लीनचीट देण्यात आली आहे. एनसीबीकडून शुक्रवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. एकूण सहा हजार पानांच्या आरोपपत्रात आर्यन खानवर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे एनसीबीकडून आर्यनला क्लीनचीट मिळाली आहे.
आर्यन खानला कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नव्हते, असे एनसीबीने म्हटले आहे. या आरोपपत्रात एनसीबीने एनडीपीएस कायद्यातंर्गत एकूण १४ जणांवर ड्रग्ज सेवनाचा ठपका ठेवला आहे. तर उर्वरित सहा जणांवरील आरोप पुराव्यांअभावी मागे घेण्यात आले आहेत. एनसीबीने कॉर्डिलिया क्रुझवर धाड टाकली तेव्हा आर्यन खान, मोहक यांना वगळून आरोपी असणाऱ्या सर्व व्यक्तींकडे ड्रग्ज सापडले होते, अशी माहिती एनसीबीचे अधिकारी संजय कुमार यांनी दिली.
याप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीला कोर्टाने मार्च अखेरीस दिलेली ६० दिवसांची मुदतवाढ दिली होती. याप्रकरणी आर्यनसह २० जणांना अटक झाली होती. आता एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानचे नाव नाही. हा त्यासाठी मोठा दिलासा आहे. एकूण १० खंडाचे आरोपपत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये सबमिट करण्यात आलेले आहे.
एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली कॉर्डिलाय क्रुझवर धाड टाकण्यात आली होती. यावेळी कॉर्डिलाया क्रुझवर ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी काहीजणांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये आर्यन खानचा समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणात आर्यन खानला जाणुनबुजून गोवण्यात आल्याची माहिती नंतर समोर आली होती.
आर्यन खान याला अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला याप्रकरणात जाणीवपूर्वक गोवल्याचा आरोप करण्यात आला होता. बऱ्याच गदारोळानंतर एनसीबीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली होती. या समितीनेही आर्यन खानला क्लीनचीट दिली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |