01:30pm | Sep 22, 2021 |
वडूज : गर्भवती महिलेचा प्रसुतीदरम्यान झालेल्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून वडूज, ता. खटाव येथील डॉ. अकबर काझी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वडूज न्यायालयाने दिले. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर न्यायालयात दिलासा मिळाला असून रासप च्या मागणीला यश आले आहे अशी प्रतिक्रिया रासप यूवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर यांनी दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खटाव तालुक्यातील मायणी येथील गरीब कुटुंबातील सदस्य सौ स्वाती बाबूराव माने ही महिला गरोदर होती. गरोदर असल्याने नियमित होणारे उपचार हे वडूज-कराड रस्त्यावरील डॉ. अकबर काझी याच्या मातृसेवा हॉस्पिटलमध्ये सुरू होते. यादरम्यान डॉ. काझी याने सौ स्वातीची प्रसूती ही सर्वसाधारणपणे होईल, असे सांगितले होते. जुलै महिन्यात स्वातीला प्रसुती कळा सुरू झाल्याने कुटुंबियांनी तिला मातृसेवा हॉस्पिलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी डॉ. काझी यांनी सौ स्वाती यांची तपासणी करून काही गंभीर बाब नसून सर्वसाधारण प्रसुती होईल, असे सांगितले. त्यानंतर स्वातीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेवून प्रसुती केली. यानंतर स्वाती यांना रक्ताची गरज असल्याचे सांगत त्यांच्या पतीला रक्त आणण्यासाठी पाठवले. रक्त घेवून आल्यानंतर डॉ. काझी याने सौ स्वाती यांना तात्काळ कृष्णा हॉस्पिटलला हलवावे लागेल, असे सांगितले.
कृष्णा हॉस्पिटल येथे स्वाती यांना नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी डॉ.काझी कुठे आहेत? अशी विचारणा केली. मात्र, डॉ. काझी हे त्यावेळी निघून गेले होते. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला व त्यांना कृष्णा हॉस्पिटल येथे येण्यास विनंती केली. परंतु, डॉ. काझी कृष्णा हॉस्पिटलमध्ये आले नाहीत. रात्री उशिरा सौ स्वाती माने यांचे निधन झाले.कुटुंबियांनी स्वातीच्या मृत्यूचे कारण कृष्णा हॉस्पिटलमधील डॉक्टरांना विचारले असता डॉ. काझी यांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुती व्यवस्थित झाली नसून रक्तस्त्राव मोठया प्रमाणात झाल्याने हा मृत्यू झाल्याचे स्पष्टपणे सांगितले.
कुटुंबियांनी याप्रकरणी डॉ. काझी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वडूज पोलिसांकडे केली होती. मात्र, पोलिसांनी त्याचे म्हणणे ऐकले नाही तसेच जाणीवपूर्वक तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. अखेर न्याय मिळावा म्हणून माने कुटुंबियांनी रा.स.प.सातारा जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या सहकार्याने वडूज न्यायालयात दाद मागितली. त्यावर सुनावणी होवून न्यायालयाने डॉ. काझी याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वडूज पोलिसांना दिले. त्यानुसार मंगळवारी रात्री उशीरा डॉ. काझी याच्यावर गुन्हा दाखल झाला.अध्याप त्यांना अटक झाली नसून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अशी माहिती मिळाली आहे. दोन महिन्यांनंतर पुन्हा या प्रकरणी वाचा फुटल्याने वडूज परिसरात चांगलीच उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रसार माध्यमांनाही दखल घ्यावी लागली आहे.
साताऱ्यात केरळ येथील चोरीचे सोने खरेदी केल्या प्रकरणी पोलिसांनी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला. पण, अद्याप त्यांना अटक झाली नाही. त्यानंतर डॉक्टरांबद्दल हा दुसरा प्रकार घडल्याने डॉक्टरांकडून 'देवा'आता तुम्हीच वाचवा', अशी म्हणायची सर्वसामान्यांवर वेळ आली असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |