12:56pm | Jun 27, 2021 |
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी धावपटू मिल्खा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. यासोबत पंतप्रधान मोदींनी कोरोनावरील लसीची भीती दूर केली आणि नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान मोदींनी मन की बातच्या ७८ व्या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधला.
मध्य प्रदेशातील एक ग्रामस्थ राजेश हिरावे यांनी लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला. व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेजमुळे आपण घाबरलो आणि लस घेतली नाही, असं ते म्हणाले. याला उत्तर पंतप्रधान मोदींनी नागरिकांमधील लसीची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींनी आपला आणि आपल्या आईच्या अनुभव सांगितला. मी आणि माझ्या आईनेही कोरोनावरील लस घेतली आहे. यामुळे घाबरू नका, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
नागरिकांमध्ये गैरसज आणि अफवा पसरवू नका. मी आणि माझ्या आईनेही कोरोनावरील लस घेतली आहे. यामुळे तुमच्या गावात ज्या काही अफवा पसरल्या आहेत त्यात कुठलेही तथ्य नाही. आपल्या देशातील २० कोटींहून अधिक नागरिकांनी कोरोनावरील लसीचे डोस घेतले आहेत. यामुळे लसीबाबत गैरसमज करू नका. तुम्हीही लस टोचून घ्या. आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. आपल्याला लसीकरणचा वेग वाढवायचा आहे. अफवांना बळी पडू नका, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
कोरोनावरील लस घेण्यासाठी आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांनी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवा. कोरोनावरील लस किती प्रभावी? हे नागरिकांना समजवा. अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकांना लस घेण्यासाठी प्रेरित करा आणि लस घेतल्याने काहीही वाईट होत नाही. कोरोनाविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती वाढते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले. मिल्खा सिंग हॉस्पिटलमध्ये त्यावेळी आपण त्यांच्याशी बोललो. तुम्ही १९६४ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यामुळे या ऑलिम्पिकसाठी तुम्हाला आपल्या भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य वाढवायचे आहे. त्यांना तुम्ही आपल्या संदेशाने प्रेरणा द्या. खेळासाठी त्यांनी जीवन वाहिलं आणि ते भावूक होते. आजारी असतानाही त्यांनी लगेच होकार दिला होता. पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाले, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |