10:33pm | Oct 19, 2020 |
सातारा : सोमवारी जिल्ह्यात 8 बाधितांचा मृत्यू झाला असून 209 बाधित निष्पन्न झाले आहेत. तसेच 726 नागरिकांना डिस्चार्ज दिला असून 453 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची वाढती संख्या आणि घटता मृत्यूदर सातारकरांसाठी आशादायक असला तरी सामाजिक भान ठेवून त्यांनी प्रशासनिक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचीही गरज निर्माण झाली आहे. तर आणि तरच सातारा जिल्हा कोरोनामुक्तीच्या दृष्टीने वाटचाल करेल. सोमवारी 8 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 1 हजार 438 वर पोहोचली आहे. तर, जिल्ह्यात 209 बाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 43 हजार 856 वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 726 नागरिकांना कोरोनातून खडखडीत बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 37 हजारांचा आकडा पार करीत 37 हजार 308 वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यातील 4 हजार 910 रुग्णांवर उपचार सुरु असून 453 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
8 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या अंबवडे ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, फत्तेपुर ता. सातारा येथील 78 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये शेंदूरजणे ता. वाई येथील 63 वर्षीय पुरुष, वाळवा जि. सांगली येथील 42 वर्षीय पुरुष, रहिमतपूर ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला, व्यंकटपुरा पेठ ता. सातारा येथील 94 वर्षीय पुरुष, कोळेवाडी ता. कराड येथील 57 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले हिंगणगाव ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
453 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 41, कराड येथील 18, फलटण येथील 19, कोरेगाव येथील 45, वाई येथील 17, खंडाळा येथील 18, रायगाव येथील 45, पानमळेवाडी येथील 38, महाबळेश्वर येथील 10, पाटण 29, दहिवडी येथील 25, तळमावले 30, म्हसवड येथील 29 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 89 असे एकूण 453 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |