04:35pm | Jan 14, 2021 |
सातारा: सातारा जिल्हयातील 652 ग्रामपंचायतीसाठी उद्या शुक्रवार दि.15 रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून गुरूवारी दिवसभर मतदान यंत्रे मतदान केंद्रावर पोहोचविण्याचे काम सुरू होते. निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
जिल्ह्यात एकूण 878 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गेले महिनाभर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याच्या सत्तेत शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्रित असल्याने निवडणुका बिनविरोध करण्याच्या कल्पनेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात 118 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून तीन ग्रामपंचायती अशा आहेत, की त्या ठिकाणी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्जच दाखल केलेला नाही.
352 ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान
ग्रामपंचायतींच्या एकूण जागांपैकी काही जागांसाठी वैध नामनिर्देशनपत्र अप्राप्त असल्यामुळे व उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान न होणार्याग्रामपंचायतींची संख्या 105 इतकी आहे. जिल्ह्यातील 652 ग्रामपंचायतींसाठी दि. 15 रोजी मतदान पार पडत आहे. निवडणूक होणार्याएकूण जागांची संख्या 7264 इतकी आहे. एकही वैध नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्याने रिक्त राहिलेल्या जागांची संख्या 386 इतकी आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिनांकानंतर एका जागेसाठी फक्त एकच वैध नामनिर्देशनपत्र शिल्लक राहिल्याने बिनविरोध झालेल्या जागांची संख्या 2648, तर प्रत्यक्ष मतदान होणार्याजागांची संख्या 4230 इतकी आहे.
निवडणूक असलेल्या गावांमध्ये प्रचाराच्या अंतिम टप्प्यात तुफान रणधुमाळी पहायला मिळाली. चौकाचौकात बॅनर, घरोघरी पत्रके, रस्तोरस्ती वाहनातून ध्वनीक्षेपकावरून प्रचार यामुळे एकूणच वातावरण ढवळून निघाले होते. काही ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून हायटेक प्रचारही केला गेला. आज जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी पडद्यामागच्या प्रचाराला कमालीची गती आली आहे.
अत्यंत अटीतटीच्या लढती असलेल्या ठिकाणी मतदारांना विविध आमिषे दाखवली जात आहेत. विविध ठिकाणी कार्यकर्त्यांना धाबे खुले होते, तर घरच्या मंडळींसाठी मटणाची किलोकिलोची पाकिटे पोहोच केली गेली. तसेच राजकीय कारकिर्दीवर ‘संक्रांत’ येऊ नये म्हणून काही उमेदवार व पॅनेलनी मकर संक्रांतीचे निमित्त साधून घरोघरी ‘वाण’ पाठवले आहेत. आता मतदार राजा कोणाच्या ओट्यात मतांचे ’दान’ टाकतो याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |