01:05pm | Aug 03, 2022 |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी देशातील वाढत्या महागाईविरोधात आंदोलन सुरु केले आहे. ते 'ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन'चे उपाध्यक्ष आहेत. संघटनेच्या विविध मागण्यांसाठी ते मंगळवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनात बसले. यावेळी संघटनेचे इतरही सदस्य आंदोलनासाठी उपस्थित होते.
देशातील वाढत्या महागाईवर प्रतिक्रिया देताना प्रल्हाद मोदी आंदोलनादरम्यान सरकार विरोधी घोषणा बाजी केली. तसेच याविषयी बोलताना, "ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक निवेदन सादर करणार आहे. ज्यामध्ये आमच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांची यादी देण्यात येणार आहे. वाढत्या महागाईमुळे दुकाने चालवण्यासाठी जादा खर्च करावा लागत आहे. अशा स्थितीत आमच्या मार्जिनमध्ये केवळ २० पैसे प्रति किलो वाढ करणं, ही क्रूर चेष्टा आहे. आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी आम्हाला दिलासा द्यावा आणि आमची आर्थिक दुर्दशा संपवावी."
"ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बुधवारी बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल" असंही प्रल्हाद मोदी यांनी यावेळी सांगितलं. तर ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस विश्वंभर बसू यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, ते बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेण्याची तयारी करत आहेत.
केंद्र सरकारने तांदूळ, गहू आणि साखरेची नुकसानभरपाई द्यावी. खाद्यतेल आणि डाळींचं वाटप रास्त भाव दुकानांमधून करावं. तसेच मोफत अन्नधान्य वितरणासाठी 'पश्चिम बंगाल रेशन मॉडेल' देशभरात लागू करावं, अशा मागण्या या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |