सातारा : फलटण, ता. फलटण येथील गुन्हेगार अभिजीत बाळासाहेब जानकर याला आज दोन वर्षाकरिता सातारा जिल्ह्यासह बारामती, पुरंदर तालुका आणि सोलापूर येथून हद्दपार करण्यात आल्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक तथा प्राधिकरण अजयकुमार बन्सल यांनी रविवारी रात्री उशिरा पारित केला.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून दिलेली माहिती अशी, अभिजीत बाळासाहेब जानकर, रा. शुक्रवार पेठ, फलटण, ता. फलटण याच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची आणि कागदपत्रांची छाननी केली असता त्याला हद्दपार करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध झाले. त्यामुळे फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्याला सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार का करू नये? अशी नोटीस दि. १८ एप्रिल २०२२ रोजी बजावली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे निष्पन्न झाले की, फलटण शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर काही गुन्हे दाखल असून एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. जानकर हा फलटण शहरामध्ये शरीराविरुद्धचे गुन्हे करून कायदा व सुव्यवस्था बिघडवत असल्याचे दिसून आले. त्याच्या दहशतीमुळे अनेक लोक गुन्हे दाखल करत नाहीत अथवा तडजोड करतात, असे स्पष्ट झाले होते. राजकीय आकसापोटी त्याने मारहाण केल्याच्या घटनाही पोलिस ठाण्यात नमूद आहेत. शिवीगाळ, दमदाटी करणे, हप्त्यांची मागणी करणे असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहेत.
त्याच्या दबाव व दहशतीमुळे लोकांमध्ये भीतीचे व असुरक्षितपणाचे वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्ट होते. भविष्यात सुद्धा जानकर हा शरीराविरुद्धचे गुन्हे करण्याची दाट शक्यता असल्याने फलटण शहर पोलीस ठाण्याच्यावतीने त्याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा प्राधिकरण अजयकुमार बन्सल यांच्याकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाला अजयकुमार बन्सल यांनी रविवारी रात्री उशिरा मंजुरी दिली असून अभिजीत बाळासाहेब जानकर याला सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केल्याचा आदेश पारित केला आहे. नियमानुसार या आदेशावर तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |