04:14pm | Nov 21, 2020 |
नवी दिल्ली: सीमेपलिकडून पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील एका जवानाला वीरमरण आले आहे. करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील संग्राम शिवाजी पाटील यांना शुक्रवारी वीरमरण आले. आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दुसर्या जवानाला वीरमरण आल्याने कोल्हापुरावर शोककळा पसरली आहे.
यापूर्वी पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात ऋषिकेश जोंधळे शहीद झाले होते. दिवाळीच्या दिवशीच त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला आहे. शहिद जवान हे संग्राम पाटील हा सैन्यदलातील ‘16 मराठा बटालियन’मध्ये कार्यरत होते.
संग्राम पाटील हे अठरा वर्षांपूर्वी सैन्यदलामध्ये भरती झाले होते. त्यांची 17 वर्षाची मुदत गेल्या वर्षी संपली होती. सतरा वर्षे देश सेवा केल्यानंतर आणखी दोन वर्षे त्याने मुदत वाढवून घेतली होती. मात्र शुक्रवारी पाकिस्तानच्या भाड हल्ल्यामध्ये त्यांना वीरमरण आले आहे.
संग्राम पाटील शहीद झाल्याचं वृत्त काही वेळातच कोल्हापुरात येऊन धडकलं. त्यानंतर सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राजौरी इथं पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा येथील जवान संग्राम पाटील यांना वीरगती प्राप्त झाली. संग्राम पाटील यांचं हे बलिदान देश कधीही विसरणार नाही. देशाच्या या वीर सुपुत्राला माझी भावपूर्ण श्रद्धांजली!, अशा शब्दात रोहित पवार यांनी अभिवादन केलं आहे.
111 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
पसरणी येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
अपघातात एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा |
बैलाची कत्तल केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे |
वडुथ येथे घरफोडी करून 19 हजार रुपयांचा ऐवज लंपास |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
हृदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू |
प्रतापसिंहनगरमध्ये तलवार हल्ला करणार्या दोघांना अटक |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
सातार्यात आंचल दलाल यांचा धडाका |
आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या |
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळा कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे रद्द |
1 मार्च रोजी लोकशाही दिन |
25 फेब्रुवारी रोजी जात वैधता प्रमाणपत्राबाबत ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन |
वीज कनेक्शन तोडल्याने सातार्यात व्यापार्यांचे शटर बंद आंदोलन |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
हृदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू |
प्रतापसिंहनगरमध्ये तलवार हल्ला करणार्या दोघांना अटक |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
सातार्यात आंचल दलाल यांचा धडाका |
आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या |
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळा कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे रद्द |
1 मार्च रोजी लोकशाही दिन |
25 फेब्रुवारी रोजी जात वैधता प्रमाणपत्राबाबत ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन |
वीज कनेक्शन तोडल्याने सातार्यात व्यापार्यांचे शटर बंद आंदोलन |
विद्यार्थ्यांनी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा: प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे |
गांजा शेती करणार्या फॉरेनर्सचा कारागृहात धुमाकूळ |
जिल्हयात एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
महाडीबीटी पोर्टलवरील कृषी योजनांसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी पुढील कार्यवाहीबाबत कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन |
शिष्यवृत्तीचे महाडिबीटीवर जास्ती जास्त अर्ज भरुन घेण्याचे आवाहन |