12:47pm | Jun 04, 2020 |
मेलबर्न: ऑस्ट्रेलियात लवकरच टी 20 क्रिकेट सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. करोना व्हायरसमुळे सुमारे दोन महिन्यांहून अधिक काळ बंद क्रिकेट सामने बंद आहेत. या सामन्यावेळी प्रेक्षकांनाही परवानगी देण्यात येणार असल्याचे समजते.
ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे जून महिन्यात टी 20 स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या आधी काही फुटबॉल आणि क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या, पण त्या स्पर्धा विनाप्रेक्षक होत्या. पण या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवण्यात येणार आहे. सीडीयू टॉप एंड टी 20 नावाची ही स्पर्धा राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, या स्पर्धेत15 सामने खेळवण्यात येणार असून राणीच्या वाढदिवसानिमित्त 6 ते 8 जून या कालावधीत ही क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. करोना व्हायरसच्या तडाख्यानंतर अनेक ठिकाणी फुटबॉल आणि छोटेखानी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पण या सर्व स्पर्धांमध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी नव्हती. सीडीयू टॉप एंड टी 20 स्पर्धेत मात्र सुमारे 500 प्रेक्षकांना सामन्याच्या ठिकाणी जाऊन क्रिकेट पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील विभागात 21 मे पासून आतापर्यंत करोनाचा एकही रूग्ण आढळला नसल्याने प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. डार्विन प्रीमियर ग्रेड क्लबचे सात संघ आणि उत्तरेकडील विभागातील सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश असलेला एक संघ असे आठ संघ या स्पर्धेत सहभागी होणार
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडन यांच्यात 13 मार्च रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवण्यात आला. तो सामनादेखील प्रेक्षकांविना खेळला गेला होता. त्या सामन्यानंतर अद्याप करोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळवण्यात आलेला नाही. पण आता मात्र क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |