08:00pm | Jan 22, 2021 |
वाई : वाई शहरातील जनकल्याण व तीर्थक्षेत्र आघाड्यांच्या राजकीय आखाड्यात वाई नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या तांत्रीक व प्रशासकीय नियमांच्या मुद्यांवर पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजपुरकर यांनी हस्तक्षेप घेतल्यामुळे नगरपालिकेच्या विषय समितीच्या सर्व निवडीना स्थगिती मिळाली आहे.
दोन आघाड्यांच्या राजकीय आखड्यातील सत्तासंघर्षात प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे वाई शहराचा विकास मात्र अडचणीच्या फेऱ्यात सापडल्याची चर्चा वाईकरांमध्ये आहे. शहराच्या कल्याणासाठी व तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी दक्षिण काशी नगरीत नगरपालिकेत 'तिर्थक्षेत्र' व 'जनकल्याण' नावाच्या दोन गोंडस राजकीय आघाड्या कार्यरत आहेत. वाई नगर पालिकेत सत्ता स्थापन झाल्यापासून ते आजतागायत सत्तेच्या राजकारणापायी दोन्ही पक्षांच्या राजकीय आघाड्यांचे सत्तेच्या खुर्चीसाठी रंगलेले आखाडयाचे फड वाईकरांना वारंवार अनुभवायास मिळाले आहेत. गतवेळच्या सर्व विषय समितीच्या झालेल्या निवडीवेळी राज्यातील सत्तेच्या जोरावर जनकल्याण आघाडीने बाजी मारली होती, तर यावेळी तीर्थक्षेत्र आघाडीने मागील निर्णयाची पुनरावृत्ती करत विषय समितीच्या निवडीच रद्द करून जनकल्याण आघाडीवर शरसंधान साधले आहे.
गुरुवारी जिल्हाधिकारी शेखरसिह यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी संगीता राजापूरकर- चौगुले याच्या अध्यक्षतेखाली स्थायी सामित्याच्या निवडीसंदर्भात ऑनलाईन बैठक पार पडली. यावेळी जनकल्याण आघाडीचा वतीने स्वच्छता व आरोग्य समितीसाठी सतीश वैराट, वासंती ढेकाणे, रुपाली वनारसे यांनी, तर पाणीपुरवठा समितीसाठी महेंद्र महेंद्र धनवे, सुनीता चक्के, सुमैय्या इनामदार, या सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने नगरसेविका प्रियांका डोंगरे, स्मिता हगीर, स्मिता नायकवडी, शीतल शिंदे, नगरसेवक भारत खामकर, प्रदीप चोरगे, चरण गायकवाड, किशोर बागुल, राजेश गुरव, यांनी अर्ज दाखल केले होते.
महाराष्ट्र नगरपालिका व नगरपंचायत यांच्या अधिनियमानुसार पालिकांच्या विषय स्थायी समित्यांच्या निवडीसाठी संबधित आघाडी व संघटना नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी नोंदणीकृत असून देखील त्यांच्याकडे सदस्य संख्या अपुरी आहे. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे पुरेसे सदस्य संख्याबळ आहे, परंतु आघाडी नोंदणीकृत नाही. आघाडी नोंदणीकृत नसल्यामुळे नगरसेवकांच्या निवडीदेखील अपक्ष स्वरूपात ग्राह्य धरल्या जातात. स्थायी समित्यांसाठी तीर्थक्षेत्र आघाडीमधील सदस्यांनी दाखल केलेले अर्जही प्रांताधिकारी संगीता राजापूरकर- चौगुले यांनी फेटाळले. त्यामुळे स्थायी सामित्यांची निवड होऊ शकली नाही.
अटक केलेल्या परप्रांतीय टोळीवर स्फोटक पदार्थ बाळगल्याचाही गुन्हा |
अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
वाळूचोरी प्रकरणी एकावर गुन्हा |
धामणेर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
पावणेपाच लाख रुपयांची फसवणूक |
गळफास घेतल्याने मुलीचा मृत्यू |
औंध पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल |
कान्हरवाडीच्या सरपंच, उपसरपंचासह सोळाजणांवर गुन्हा |
कोरोनाच्या प्रसारामुळे पुसेगाव येथील रविवारचा आठवडा बाजार रद्द |
वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेणारी जनता सहकारी बँक राज्यात पहिली |
काल निष्पन्न झालेल्या 119 कोरोनाबाधितांचा अहवाल |
डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ |
117 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी |
पाचवड फाटा येथे अपघातात एक जखमी |
गळफास घेतल्याने मुलीचा मृत्यू |
औंध पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल |
कान्हरवाडीच्या सरपंच, उपसरपंचासह सोळाजणांवर गुन्हा |
कोरोनाच्या प्रसारामुळे पुसेगाव येथील रविवारचा आठवडा बाजार रद्द |
वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेणारी जनता सहकारी बँक राज्यात पहिली |
काल निष्पन्न झालेल्या 119 कोरोनाबाधितांचा अहवाल |
डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ |
117 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी |
पाचवड फाटा येथे अपघातात एक जखमी |
महिलेने केले विषारी औषध प्राशन |
सुरूर उड्डाण पुलावरील अपघातात तिघांचा मृत्यू; एकजण गंभीर |
शेंद्रे येथील डॉक्टरचे केले खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर |
बनावट सोन्याचे अमिष दाखवून लुटणारी टोळी जेरबंद |
भाजप प्रदेश महिला मोर्चाचे सातार्यात चक्काजाम आंदोलन |