10:07pm | May 01, 2023 |
सातारा : जर्मनीतील कंपनीमधील क्रिप्टो करन्सीमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळत नसल्याने त्याला कारणीभूत असल्याचे समजून तरुणाचे डेक्कन जिमखाना येथील हॉटेलमधून अपहरण केले. फलटण येथील हॉटेलमध्ये रात्रभर डांबून ठेवले. त्यानंतर फलटण येथील फ्लॅटचे जबरदस्तीने खरेदीखत करुन घेण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फलटणच्या रामराजे युवा मंचचा अध्यक्ष राहुल निंबाळकरसह आठजणांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी समीर दस्तगीर काझी (वय 40, रा. श्रीनाथ सोसायटी, थेरगाव, चिंचवड) यांनी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद (गु. रजि. नं. 73/23) दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अजिंक्य प्रताप कदम, वैभव भारत कदम, श्रेयस कदम, राहुल निंबाळकर, मनोज भगत, अभिमन्यु घनवट (सर्व रा. फलटण, जि. सातारा) व त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जंगली महाराज रोडवरील हॉटेल शुभम येथे तसेच फलटण येथे 26 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा ते 27 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे परिचयाचे आहेत. फिर्यादी यांच्या सांगण्यावरुन आरोपींनी डिजिटल टेक्नॉलॉजी प्लॅटीन वर्ल्ड (जर्मनी) या कंपनीमध्ये क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुककेली आहे. मागील 3 महिन्यांपासून कंपनीचे सिस्टीममध्ये अपडेट सुरु असल्यामुळे महिन्यांचा परतावाक्रिप्टो कॉईन स्वरुपात अकाऊंटला जमा होत होता. परंतु अपडेट सुरु असल्यामुळे भारतीय चलनात पैसे काढण्यास वेळ लागत होता. या सर्वास समीर काझी हा कारणीभूत आहे, अशी आरोपींची समजूत झाली. फिर्यादी हे हॉटेल शुभम येथे बसले असताना आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीस चाकू लावून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांना जीवे ठार मारण्याची तसेच गावाकडील घर जाळण्याची धमकी दिली. जर्मनीतील कंपनीत गुंतविलेल्या 65 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी फोरच्युनर गाडीत जबरदस्तीने बसविले. गाडी कोठे गेली हे समजू नये, यासाठी गाडीचे स्मार्ट कार्ड काढून ठेवले. त्यांना फलटण येथील महाराजा हॉटेल येथे नेले. रात्रभर डांबून ठेवले. त्यानंतर फलटण येथील शेतातील अनोळख्या फार्महाऊसवर नेले. तेथे फिर्यादी यांना चाकू लावून आम्ही सांगेल तसे कर नाही तर बघ काय करतो,अशी धमकी दिली. रजिस्टार ऑफिसमध्ये घेऊन गेले.फिर्यादी यांचे फलटणमधील लक्ष्मीनगरमधील फ्लॅट मनोज भगत याच्या नावावर जबरदस्तीने खरेदीखत करुन घेतले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना सोडून दिले. त्यानंतर पुण्यात आल्यानंतर समीर दस्तगीर काझी यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक पठाण तपास करीत आहेत.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |