12:55pm | Apr 17, 2021 |
नाशिक : कोरोना संकटाची तीव्रता वाढत असतानाच आता आणखी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. नाशिकमधील वालदेवी धरणात सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 9 मुला मुलींना या ठिकाणी फोटो घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. पाण्यात उभं राहून फोटो काढताना पाय घसरल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
लॉकडाऊनमुळे नाशिकमध्ये सर्वत्र हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते. त्यामुळे सोनी गमे (12 वर्षे) या आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे मित्रमैत्रिणी थेट वालदेवी धरण परिसरात गेले. त्यांनी सोबत केक देखील नेला होता. मात्र, यावेळी सेल्फी काढण्याच्या नादात त्यापैकी एकाचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी इतरांनीही पाण्यात उड्या टाकल्या. यामध्ये आरती भालेराव (22), हिम्मत चौधरी (16), नाजिया मनियार (19), खुशी मणियार (10), ज्योती गमे (16) आणि सोनी गमे (12) या सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले समाधान वाकळे, प्रदीप जाधव राहणार सिंहस्थनगर आणि सना नजीर मणियार राहणार पाथर्डी फाटा हे तिघे जण सुदैवाने बचावले आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, रात्री उशीर झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. शनिवारी सकाळी सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत.संध्याकाळी साधारण सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आधी या मुलांपैकी एकजण पाण्यात घसरून पडल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी इतरांनी देखील पाण्यात उड्या टाकल्या. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू ओढवला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर आरती भालेराव हिचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |