08:52pm | May 19, 2021 |
फलटण : सस्तेवाडी ता. फलटण येथील गणेश हणमंत सावंत यांचा धारदार सत्तूर या शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील संशयित आरोपींना गुन्हा घडल्यापासून एका तासात अटक करण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमधून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी कल्पना हणमंत सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आज बुधवार दि. 19 मे रोजी दुपारी 1.15 च्या सुमारास सस्तेवाडी ता. फलटण गावाच्या हद्दीत दातेवस्ती येथे मयत गणेश हणमंत सावंत (वय 35, रा.दातेवस्ती, सस्तेवाडी, ता.फलटण) यांनी आरोपी अविनाश सावंत यास शेळीचे दूध काढण्यासाठी बोलावले असता तो आला नाही. त्यामुळे मयत गणेश सावंतने आरोपी यांच्या आईबरोबर भांडणे केली. त्या भांडणाचा राग मनात धरुन यातील आरोपी अविनाश सावंत यांनी गणेश सावंतच्या डोळ्यात चटणी टाकून त्यास सतुर व नळाचे पाणी सोडण्याच्या लोखंडी पान्याने वार करुन त्यास गंभीर दुखापत करुन त्याचा खून केला आहे.
याबाबतची फिर्याद कल्पना हनुमंत सावंत यांनी दिली असून अविनाश मल्हारी सावंत व विजय मल्हारी सावंत यांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी यांना गुन्हा घडल्यापासून एका तासात अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख, पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्वाती धोंगडे, पोलीस हवालदार दत्तात्रय कदम, पोलीस हवालदार रामदास लिमन, पोलीस हवालदार राजेंद्र फडतरे, पोलीस नाईक राजेंद्र गायकवाड, हरिभाऊ धराडे, संजय देशमुख, राजकुमार देवकर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटोळे, निखील गायकवाड, गणेश अवघडे यांनी या गुन्ह्यातील आरोपींची गोपनीयरित्या माहिती घेवून त्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. ए. सोनवणे करत आहेत.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |