11:44pm | Jul 31, 2020 |
सातारा : शुक्रवारी रात्री उशिरा कोरोनाचे 203 रुग्ण निष्पन्न झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चार हजार पार झाला आहे. 54 जणांना डिस्चार्ज दिल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडाही 2036 झाला आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे एकाही बाधिताचा मृत्यू न झाल्याने कोरोनाबळींची संख्या 130 वरच स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढत असतानाच शुक्रवारी रात्री उशिरा कोरोनाचे 203 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 4052 वर पोहोचल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी दुसरीकडे कोरोनातून खडखडीत बरे होवून लोक घरी जात आहेत. आज जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असलेले 54 जण कोरोनातून खडखडीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे -
महाबळेश्वर तालुक्यातील बेल एअर हॉस्पीटल येथील 28 वर्षीय पुरुष, भिलार येथील 38 वर्षीय पुरुष., खंडाळा तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत येथील 34 वर्षीय पुरुष व 6 वर्षीय मुलगा व 8 वर्षीय मुलगी., सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन येथील 55 वर्षीय पुरुष, कामेरी येथील 51 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, गोजेगाव येथील 27, 23, 55 वर्षीय पुरुष व 2 वर्षीय मुलगी, कण्हेर येथील 18, 40 वर्षीय पुरुष व 24, 20,27, 65 वर्षीय महिला व 1 वर्षीय बालिका, शेळकेवाडी सातारा येथील 47 वर्षीय पुरुष, सातारा शहरातील बुधवारपेठेतील 16, 53, 49 वर्षीय पुरुष, जिहे येथील 34 वर्षीय पुरुष., कराड तालुक्यातील सुपने येथील 28 वर्षीय पुरुष, आटके येथील 34 वर्षीय पुरुष, नेरले येथील 15 वर्षीय मुलगी, कालवडे येथील 67,60 ,40 वर्षीय पुरुष, मलकापुर येथील 18, 30, 27 वर्षीय पुरुष, कराड शहरातील बुधवार पेठेतील 30 वर्षीय महिला, कृष्णा मेडीकल कॉलेज येथील 34 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर कार्वे नाका येथील 50 वर्षीय महिला., जावली तालुक्यातील मेढा येथील 31 वर्षीय महिला व 11 वर्षीय मुलगा, रायगाव येथील 22, 24, 31, 34, 35 वर्षीय पुरुष व 25,45,21,25 वर्षीय महिला, मोरघर येथील 30 वर्षीय महिला., पाटण तालुक्यातील नारळवाडी येथील 29 वर्षीय महिला., खटाव तालुक्यातील वडूज येथील 69 वर्षीय पुरुष., वाई तालुक्यातील बावधन येथील 59 वर्षीय महिला, शेंदुरजणे येथील 80 वर्षीय महिला व 14 वर्षीय युवक., माण तालुक्यातील आंधळी येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 25 रुग्ण कोरोनाबाधित
25 मे ते 26 जुलै या दरम्यान जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 25 रुग्णांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.गडीकर यांनी दिली.
याची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा तालुका- 16 (सातारा शहर-7), जावळी तालुका-2, वाई तालुका-1, माण तालुका-1, पाटण तालुका-1, खटाव तालुका-1, खंडाळा तालुका-1, इचलकरंजी (कोल्हापूर)-1, कडेगाव (सांगली)-1
524 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 37, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 104, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 33, कोरेगाव येथील 2, वाई येथील 44, शिरवळ येथील 52, रायगाव 14, पानमळेवाडी 15, मायणी 54, महाबळेश्वर 27, पाटण 58, दहिवडी 23, खावली येथे 13 व कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 79 असे एकूण 555 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
दिवसभरात एकही कोरोनाबळी नाही
सुमारे पाच महिन्यांपूर्वी सातारा जिल्ह्यात कोरोनाने पहिला बळी घेतला होता. त्यानंतर दररोज किंवा दिवसाआड कोरोनामुळे लोकांचे बळी जात होते. 29 जुलै रोजी दिवसभरात कोरोनामुळे तब्बल नऊजणांचा बळी गेला होता. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिवसभरात कोरोनामुळे एकही बळी न गेल्यामुळे जिल्हा प्रशासनासह जनतेनेही सुटकेचा नि:श्वास सोडला. जिल्ह्यातील कोरोनाबळींची आतापर्यंतची संख्या 130 वर स्थिर आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |