09:50pm | Aug 02, 2021 |
कराड : गोळेश्वर ता. कराड येथे जुगारात हरलेल्या पैशावरून सेंट्रीग कामगाराचा त्यांच्या मित्रानेच चाकूने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी रेकॉर्डवरील एकास अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्याच्या छडा लावण्यासाठी कराड पोलिसांनी कस लावला असून खूनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. याबद्धल त्यांचे कौतुक असून सदर केस बेस्ट डिटेक्शनसाठी पाठवणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दिली.
इस्माईल शताबुद्दीन शेख (वय 25) रा. बालुग्राम, ता. राधानगरी, जि. साहबगंज, राज्य झारखंड असे खून झालेल्याचे नाव आहे. तर मोहंमद सेटु आलम हिजाबुल शेख (वय 23) रा. इर्शादटोला ता. राजमहल, जि. साहेबगंज, राज्य झारखंड असे अटक केलेल्याचे नाव आहे.
येथील शहर पोलीस ठाण्यात सोमवारी १ रोजी सायंकाळी सदर गुन्ह्याचा उघडकीस आल्याबबतच माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील उपस्थित होते.
जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल म्हणाले, कराड तालुक्यातील गोळेश्वर याठिकाणी नदीकडे असलेल्या उसाचे शेतामध्ये पाचोळ्यात सडलेल्या अवस्थेत 13 जुलै 2021 रोजी एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला होता. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. तपासात सदर मृतदेह इस्माईल शताबुद्धीन शेख (वय 25) मुळ रा. बालुग्राम ता. राधानगरी जि. साहबगंज (झारखंड) याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या खुनातील आरोपीला शोधून काढले असून जुगारात हरलेले पैसे मिळवण्यासाठी खून झाल्याचे समोर आले.
या खुनातील आरोपीचा शोध घेणे हे पोलीसांसमोर एक आव्हान होते. तरीही कराड पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. तसेच गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत त्याला झारखंड येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जुगारात हरलेल्या पैशाचा राग मनात धरून इस्माईल शेख यास चाकूने वार करून त्याचा खून केला. तसेच त्याच्या जवळील 9 हजार 500 रुपये काढून घेतल्याची कबूल संशयिताने दिली आहे.
घटनास्थळी मिळालेल्या वस्तुत एक तुटलेल्या चांदीची चेन होती. ही चेन यातील मृत्यू झालेल्या व्यक्तीची नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. प्राप्त चेन वरून कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, पोलीस नाईक एम. एम. खान, संदीप पाटील या पथकाने धागेदोरे लावून मृत्यू झाल्यालेच्या गावी झारखंड येथे जावून मृत्यूच्या तपासकामी संबंधीत काही इसमांना कराड येथे बोलवले होते. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यातील मोहंमद सेटु आलम हिजाबुल शेख याने जुगारात हरलेल्या पैशाचा राग मनात धरून इस्माईल शेख यास चाकूने वार करून ठार केले आहे. तसेच त्याच्या जवळील 9 हजार 500 रुपये काढून घेतले असल्याची कबुली दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर संशयित मोहंमद सेटु आलम हिजाबुल शेख याला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |