सातारा : सातारा जिल्ह्याची अर्थवहिनी, सर्वसामान्यांची बँक असा नावलौकीक असलेल्या जनता सहकारी बँक लि., साताराच्या सेवक संचालकपदी अन्वर युसुफ सय्यद, अभिजीत अविनाश साळुंखे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. जनता सहकारी बँक कर्मचारी संघाने याबाबत दिलेल्या प्रस्तावास बँकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
नवनिर्वाचित सेवक संचालकांचा सत्कार बँकेचे भागधारक पॅनेल प्रमुख, जेष्ठ संचालक विनोद कुलकर्णी, बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्हा. चेअरमन विजय बडेकर, जेष्ठ संचालिका डॉ. चेतना माजगांवकर, संचालक वसंत लेवे, चंद्रशेखर घोडके, वजीर नदाफ, अविनाश बाचल, रविंद्र माने, नारायण लोहार, ॲड. चंद्रकांत बेबले, अक्षय गवळी, मच्छद्रिं जगदाळे यांची उपस्थिती होती. श्री. विनोद कुलकर्णी यांनी श्री.सय्यद, श्री. साळुंखे यांनी बँकेच्या सेवेतील केलेल्या उत्तम कामकाजाबाबत गौरवोदगार काढून बँकेतील चांगल्या कामकाजाची दखल कर्मचारी संघ, संचालक मंडळाने घेतल्याचे सांगितले.
संचालक मंडळावर निवड झाल्यामुळे ते सर्वांचे अभिनंदनास पात्र असून त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, प्रशासन अधिकारी महेंद्र पुराणिक, अधिकारी उपस्थित होते . नवनिर्वाचित सेवक संचालकांनी सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला हे यश प्राप्त झाल्याचे सांगून सर्वांना सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |