08:05pm | Feb 03, 2023 |
उंब्रज : अजूनही प्रामाणिकपणा, माणुसकीचा झरा वाहत आहे. एका बाजुला फसवणुकीच्या अनेक घटना घडतात तर दुसरीकडे सामान्यांकडून लाखोंचे ऐवज परत केले जातात. अशा लोकांमुळे प्रामाणिकपणा जिवंत आहे. कराड तालुक्यातील उंब्रज येथील आपले गांव हॉटेल मालकांचा प्रामाणिकपणा समोर आला असून जेवण करुन गेलेल्या प्रवासी वाहन धारक ग्राहकाचे विसरलेले चौदा तोळे सोन्याचे सुमारे ७ लाखाचे दागिने उंब्रज पोलीस ठाण्यात प्रामाणिकपणे जमा केले आहेत. या घटनेमुळे माणुसकी आणि प्रामाणिकपणा टिकून असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे, ता. कराड गावच्या हद्दीत आपलं गांव मनपसंद फुडमॉल या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबलेल्या एका कुटुंबाची ७ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी हॉटेल मालक यांनी तात्काळ पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून संबंधित कुटुंबियांच्या स्वाधीन केल्याने कुटुंबियांनी हॉटेल मालक यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले आहेत.
त्याचे झाले असे, गुरवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईकडे निघालेले एक कुटूंब जेवण करण्यासाठी शिवडे हद्दीतील आपलं गांव मनपसंद फुडमॉल हॉटेल या ठिकाणी थांबले होते. जेवण करुन ते कुटुंब त्यांच्या गाडीने निघुन गेले. काही वेळाने ग्राहक कमी झाल्यानंतर एका टेबलला एक पिशवी विसरली असल्याचे हॉटेल मालकांच्या लक्षात आले.
हॉटेल मालक विजयसिंह जाधव, दिलीपराव पाटील, बाळासाहेब ढवळे व अर्जुन कोळी यांनी ती पिशवी हॉटेलमध्ये त्यावेळी असणाऱ्या ग्राहकांकडे चौकशी केली असता प्रतिसाद मिळाला नाही. या पिशवीमध्ये सोन्याचा नेकलेस, चार पाटल्या, दोन अंगठया असा ऐवज असल्याने हॉटेल मालक यांनी तात्काळ दागिन्यांची बॅग उंब्रज पोलीस स्टेशनला जमा केली.
उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदशनाखाली उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पोलिस हवालदार दिपक जाधव, सचिन देशमुख, कराड शहर पोलीस ठाण्याचे राजेंद्र देशमुख, महिला पोलीस चव्हाण यांनी पिशवी मालकांचा शोध घेवून त्यांना उंब्रज पोलीस ठाण्यात बोलावून त्या पिशवीतील वस्तूंची ओळख पटवून पिशवीचे मालक अशफान अयाज मुलाणी, त्यांची पत्नी शर्मिन मुलाणी रा. चेंबुर, मुंबई यांच्या ताब्यात दागिन्याची पिशवी सुपूर्द केली. सुमारे सात लाख रुपये किंमतीचे दागिने असलेली पिशवी प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल हॉटेल मालक विजयसिंह जाधव, दिलीपराव पाटील, बाळासाहेब ढवळे व अर्जुन कोळी यांच्यासह पोलिस टीमचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |