पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाली, परंतु ती माध्यमांसमोर सांगणे योग्य नाही. काही गोष्टी राजकारणात लपवून ठेवाव्या लागतात, सर्वच प्लॅनिंग उघड केले तर समोरच्या माहिती पडेल असं विधान वडेट्टीवार यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर केले आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. बारामतीत एका कार्यक्रमाला आलो असताना सदिच्छा भेट घेतली, भेटीत राजकीय चर्चा झालीच, पण ती माध्यमांसमोर उघड करणे योग्य नाही. सध्या सत्ताधाऱ्यांची मती भ्रष्ट झालीय, त्यात चुकीनं अनेक पाऊले उचलली जातात. त्यात आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्रात तोंड पाहून दुष्काळ जाहीर केला जातो, ३ पक्षाच्या सरकारमध्ये हे अभिप्रेतच होते. राज्यातील सत्ताधारी आमदार स्वत:चा मतदारसंघ वाचवण्यासाठी धडपड करतोय, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी नव्हे तर आपला जीव वाचवावा अशी भूमिका सत्ताधाऱ्यांची आहे असा टोला त्यांनी लगावला.
त्याचसोबत पुरोगामी महाराष्ट्रात जात धर्मावरून तेढ निर्माण होणे योग्य नाही. २ समाजात दरी निर्माण होईल आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला कलंक लागू नये ही भूमिका आहे. प्रत्येकाला त्याचा अधिकार मागण्याचा अधिकार आहे. घटनेनुसार जे आहे ते मिळाले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का नको, आगीत तेल ओतण्याचे काम कुणी करू नये असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
दरम्यान, सत्तेतील लोक दोन्ही बाजू सांभाळतायेत, राज्यात २८ लाख जणांना कुणबी प्रमाणपत्र दिलंय, ओबीसीत सर्वांना घेणार का. यावर एकच पर्याय राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे राज्यात जातीय जनगणना करावी आणि लोकसंख्येनुसार ज्याचा त्याला वाटा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |