09:09pm | Jan 22, 2023 |
सातारा : सातारा शहरातील गुरुवार पेठ सिटी सर्वे क्रमांक 383 येथील चैतन्य रेसिडेन्सी च्या रहिवाशांनी सामूहिकरीत्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. चैतन्य सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीत इमरान अल्ताफ शेख यांनी बेकायदेशीर बांधकाम करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने सदनिका धारक संतप्त झाले आहेत.
ओरिएंटल डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर इमरान शेख यांच्या विरोधात सदनिका धारकांची तक्रार आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार शेख यांनी संगनमताने आणि दांडगाईने इमारतीच्या जागेत अनधिकृत बांधकाम करून इमारतीला धोका उत्पन्न केला आहे. नगरपालिकेकडे सदनिका धारकांनी तक्रार करूनही पालिकेच्या बांधकाम विभागाने कोणतीही नोटीस बजावणी तसेच फौजदारी कारवाई केलेली नाही. 11 जुलै 2012 रोजी संबंधित इमारतीला पूर्णत्व दाखला देण्यात आला आहे. त्यामुळे सदर तारखे नंतर केलेले कोणतेही बांधकाम हे अनधिकृत आहे. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना सुरू झालेल्या अनधिकृत बांधकामा संदर्भात वेळोवेळी कल्पना देऊनही अद्याप त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. जनरेटा वाढल्यानंतर 10 ऑक्टोबर 2022 व 22 डिसेंबर 2022 या पत्राद्वारे इमरान शेख यांना बांधकाम त्वरित काढून घेण्याबाबत नगरचना अधिनियम 66 प्रमाणे 52- 53 ची नोटीस बजविण्यात आली होती. मात्र त्यांनी त्या नोटिशी नंतरही बांधकाम सुरूच ठेवले.
संस्थेच्या आवारातील असलेल्या पुरातन मंदिरासमोर अनधिकृत संडास टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांना या पवित्र स्थानाचे दर्शन घेण्यासाठी अटकाव करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखवण्याचा व सामाजिक तेढ निर्माण होण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. सातारा पालिकेचे भाग निरीक्षक प्रकाश शेळके यांच्यामार्फत पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने इमरान शेख यांचे बांधकाम सुरूच आहे. संस्था सभासद संजीव सुपेकर यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट व नगररचनाकार धनके, भाग निरीक्षक प्रकाश शिर्के यांना बांधकामाबाबत परिस्थिती कळवली होती. तथापि त्यांच्याकडूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे गृहनिर्माण संस्थेतील विनापरवाना बांधकाम मागणी करूनही बंद करण्याचा निर्णय न झाल्याने संबंधित रहिवाशांनी संतप्त होऊन प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |