सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचार्यांना नियमित सेवा व सुविधा मिळत नसल्याने कंत्राटी कर्मचार्यांच्या सातारा जिल्हा मजदूर संघाचे सरचिटणीस रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले आहे.
विठ्ठल जामकर, गणेश माने, शेखर निकम, जनार्दन जाधव, अमित शिंदे, गणेश पवार, आकाश पवार, सुरज खोमणे,चेतन दनाने, श्रीराम जाधव, चेतन दणाणे, सुनील जगताप, रवी चलवादी, प्रकाश शिवदास, सुरज पिसाळ, चेतन काकडे इत्यादी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत
रविंद्र माने या आंदोलनाची माहिती देताना म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निरंतर सेवा देणार्या कंत्राटी कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधी कपात करून त्यांचे पीएफ नंबर त्यांना दिले जावेत, राज्य कामगार विमा योजना लागू करावी, कर्मचार्यांना ओळखपत्र मिळावे, कामावर असताना लागणारे सुरक्षा साधने पुरवण्यात यावी दरमहा पगाराची स्लिप देण्यात यावी या गोष्टींची चर्चा सहाय्यक, कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात 22 जून रोजी झालेल्या बैठकीत झाली होती. परंतु एक वर्षानंतरही संबंधित ठेकेदाराने या मागण्याची दखल घेतली नाही. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला तरी हा प्रश्न सुटलेला नाही. प्राधिकरणाला नेमलेल्या कंत्राटदाराने मी देईन तेवढाच पगार घ्यावा लागेल. पीएफ बोनस काही मिळणार नाही. करायचे असेल तर करा नाहीतर काम सोडून द्या, अशी भाषा वापरली आहे. संघटनेचे बरेचसे कर्मचारी पंधरा वर्षापासून नोकरी करत आहेत. विनाकारण कोणतीही चूक नसताना नोकरीवरून काढून टाकल्यास त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यासंदर्भात लक्षणीय धरणे आंदोलन करूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचार्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
त्यांच्या या आंदोलनाच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शहराच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणार्या 13 टाक्या येतात, या टाक्यांच्या पाण्याचे नियमन, घंटेवारी तसेच माहुली येथील जल उपसा केंद्रामध्ये पाण्याची पातळी तपासणे इत्यादी तांत्रिक कामांसाठी कर्मचार्यांची गरज असते ही सर्व कामे कोलमडून पडली आहेत. शाहूनगर, शिवनेरी कॉलनी, जगतापवाडी या भागाला गेल्या काही दिवसापासून पाणी नसल्याने नागरिकांची परवड सुरू झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयांमध्ये अधिकारी वगळता प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे चतुर्थ श्रेणी कामगार नसल्यामुळे भूतपूर्व टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा विषय संवेदनशील असून जिल्हा प्रशासनाने कंत्राटी कर्मचार्यांच्या मागण्याकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी सातारा मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन
बेमुदत आंदोलनाच्या इशार्याने पाणीपुरवठा सेवा विस्कळीत
by Team Satara Today | published on : 18 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा