11:23am | Nov 18, 2023 |
सातारा : विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने 23 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर कालाधीत जिल्ह्यातील 22 गावांमध्ये विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात यावे. त्याचबरोबर गावातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व संकल्प यात्रा यशस्वी करणसाठी सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.
विकसित भारत संकल्प यात्रा पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी डूडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
विकसित भारत संकल्प यात्रा प्रभावी राबविण्यासाठी जिल्हास्तरावर समितीची स्थापना करण्यात आलेली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डुडी म्हणाले ही संकल्प यात्रेचे कार्यक्रम 11 तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींमध्ये घ्यावयाचे आहेत. हा कार्यक्रम 11 दिवसांचा असेल. प्रत्येक दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये कार्यक्रम घ्यावेत. मोठ्या गावांची व लोकसंख्या जास्त असलेल्या गावांची निवड करावी. कार्यक्रमाच्या दिवशी त्या गावात आरोग्य शिबीर, विविध दाखल्यांचे वाटप करावयाचे आहेत यासाठी लाभार्थ्यांची निवड करुन कागदपत्रांची पुर्तता आत्तापासूनच करावी.
निवडलेल्या गावात उत्सव व स्वागत समितीची स्थापना करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, प्रत्येक गावात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे. कार्यक्रम दर्जेदार होण्यासाठी गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करावे. यामध्ये महिला बचत गट, स्वयंसेवी कलापथकांची मदत घ्यावी. शाळा महाविद्यालयांनी स्वच्छता स्पर्धांचे आयोजन करावे.
आयुष्यमान भारत योजना राबविण्यात आपण अग्रेसर होतो. हे काम आता थोडे संथ झाले आहे. याला अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी महिला बचत गटांची मदत घ्यावी. बचत गटांच्या महिलांनी त्यांच्या ॲपवर लाभार्थ्यांची माहिती भरुन पाठवावी, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
विकसित भारत संकल्प यात्रेसाठी निवडण्यात येणारी गावे ही मोठी असावीत. या गावांनी कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभागी व्हावे. यात्रेच्या कार्यक्रमाची सुरुवात महाबळेश्वर, खंडाळा व वाई येथून होणार आहे. त्यामुळे येथील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी कार्यक्रमांची तयारी सुरु करावी. निवडलेल्या प्रत्येक गावात आरोग्य शिबीरे घ्यावयाची आहेत त्यामुळे ज्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत अशा गावांची प्राधान्याने निवड करावी, मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी यांनी केल्या.
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |