08:12pm | Nov 17, 2023 |
सातारा : सातारा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सातारा शहर वाहतूक विभाग व सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी पोवई नाका ते सेव्हन स्टार सिनेमा यादरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली.
तहसीलदार कार्यालयाच्या भिंती लगत असणाऱ्या विक्रेत्यांचे फुटपाथपुढे आलेली शेडची अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारवाई दरम्यान विक्रेते व नगरपालिका कर्मचारी यांच्यामध्ये काही काळ शाब्दिक बाचाबाची झाली.
सातारा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ग्रेड सेपरेटरची योजना करण्यात आली आहे. तरीसुद्धा सातारा एसटी स्टँड परिसरातून बाहेर पडणाऱ्या एसटी तसेच तहसीलदार ऑफिसच्या दारामध्ये अरुंद झालेला रस्ता यामुळे रविवार पेठेतील जुन्या मशिदी समोरील रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहतूक विभागाला येथे वाहतूक नियमन करणे प्रचंड जड जात आहे. त्यामुळे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांनी यासंदर्भात सातारा पालिकेशी पत्रव्यवहार केला होता.
त्यानुसार वाहतूक विभागाचे पथक व सातारा पालिकेचे अतिक्रमण हटाव पथक यांनी संयुक्तरीत्या सकाळी साडेदहा वाजल्यापासून सातारा एसटी स्टँड ते पोवई नाका यादरम्यान कारवाईला सुरुवात केली. तहसीलदार ऑफिसच्या भिंतीलगत स्टॉल धारकांनी फुटपाथपासून पुढे तीन-तीन फुटाचे शेड, फलक, बांबूच्या कमानी अशी अतिक्रमणे केली होती. ती सर्व अतिक्रमणे सुमारे अडीच तासाच्या कारवाईमध्ये काढून टाकण्यात आली. यावेळी काही विक्रेत्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना कारवाईचा सज्जड इशारा दिल्यानंतर विरोध मावळला. पुढे या मोहिमेत स्वतःहून विक्रेत्यांनी काही अतिक्रमणे काढून घेतली. त्यामुळे दुपारनंतर येथील वाहतूक प्रक्रियेमध्ये अत्यंत सुलभता आली.
यापुढे फुटपाथवर अथवा फुटपाथच्या लगत अतिक्रमण केल्यास टपरी जप्त करण्यात येईल, असा इशारा सातारा पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. या कारवाईमध्ये वाहतूक विभाग व सातारा पालिकेचे कर्मचारी अशा 49 जणांनी सहभाग घेतला होता. कारवाई सुरू असताना काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. मात्र पोलिसांनी वाहतुकीचे नियमन करत वाहने पुढे मार्गस्थ केली.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |