सातारा : राम मंदिर जरी बांधून झाले असले तरी त्याचा येणार्या लोकसभा निवडणुकीत मतासाठी फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत नाही. म्हणूनच जातीय तेढ निर्माण करण्याचा भाजप वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहेत. सध्या देशात भाजप विरोधात वातावरण आहे. पण त्याचा फायदा घेण्यासाठी विरोधकांची एकजूट तितकीच गरजेची आहे, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री तथा आ. चव्हाण यांनी व्यक्त केली.
आमदार चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्ताने फराळाचे आयोजन केले होते. त्यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, दिवाळीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भेटले. पण पवारांचे घरातल्या घरात नेमके काय चालू आहे, हे समजत नाही. त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विश्लेषण करणारा अजून जन्माला यायचा आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे व्यवहारिकदृष्ट्या योग्य होते; पण पुढे आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला ते टिकवता आले नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले पाहिजे. त्यांच्यासमोर त्यासंदर्भातील योग्य मांडणी केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात ते म्हणाले, अजून आमच्या आघाडीत कोण कोणती जागा लढवणार, हे निश्चित नाही. ते बैठक घेवून पहिल्यांदा ठरले पाहिजे. महाविकास आघाडी जो निर्णय होईल त्यावर माझी पुढील दिशा ठरेल.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |

सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |