कराड : शहरात रोजच्यापेक्षा आज थंडीचा कडाका जास्तच होता. बोचरी थंडी अंगाला झोंबतही होती; पण त्याची काळजी न करता मराठा समाज बांधवांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणांचा आवाजही घुमत होता. सायंकाळी सातपासूनच सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमकडे येत होते.
तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा बांधवांमध्ये कमालीची शिस्तही दिसत होती. डोक्यावर भगवी टोपी अन् ओठांवर एक मराठा, लाख मराठा...ची घोषणा स्टेडियमसह आसमंतही दुमदुमून टाकत होती. त्याला निमित्त होते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे- पाटील यांच्या सभेचे.
कराडची सभा उशिरा होणार, याची माहिती असतानाही तालुक्यासहीत खानापूर, कडेगाव तालुक्यांतून आज मराठा बांधव येथे एकत्रित आले होते. दिसेल त्या चौकातून मराठा बांधवांच्या घोषणांचा जणू पाऊस पडत होता. आरक्षण आमच्या हक्काचे... छत्रपती शिवाजी महाराज की जय..., जय जिजाऊ... जय शिवराय... अशा घोषणा देत दत्त चौक, कृष्णा नाका, कार्वे नाका, कोयना पुलाकडून जथ्थेच्या जथ्थे स्टेडियमकडे येत होते.
जरांगे-पाटील यांचा मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी तिसऱ्या टप्यातील दौरा होत आहे. त्यापूर्वी ते जयसिंगपूर, कोल्हापूर व इस्लामपूरहून येत आले. त्यानंतर ते कोकणाच्या दौऱ्यावर जात आहेत. छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये सभेची जोरदार तयारी केली होती. महिला, पुरुषांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, आकर्षक लाइटची व्यवस्था, ठिकठिकाणी लावण्यात आलेले भगवे झेंडे यामुळे चांगलीच वातावरण निर्मिती झाली होती. जरांगे-पाटील यांच्या भाषणापूर्वी स्टेडियममध्ये उपस्थित आबालवृद्ध मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. कडाक्याच्या थंडीतही आबालवृद्ध स्टेडियममध्ये बसून होते. कोणाची काहीच चुळबूळही होत नव्हती, हे विशेष.
जरांगे-पाटील उशिरा आले तरीही..!
कितीही वेळ झाला तरीही जरांगे-पाटील यांना ऐकण्याची मानसिकता घेऊन कराडमध्ये आलेल्या मराठा समाजाने थंडीलाही हरवले होते. सभा नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळाने होणार असल्याची कल्पना असूनही कोणी जागचा हलला नव्हता. सभेसाठी सायंकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. ती कायम होती.
पोलिसांचा फौजफाटा तैनात
पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यासाठी दोन पोलिस निरीक्षक, २३ पोलिस अधिकारी, १८० पोलिस कर्मचारी, होमगार्ड २५, दंगा काबू पथक एक व साध्या वेशातील विविध पोलिसांची पथके बंदोबस्तासाठी तैनात होती. सायंकाळी बाँब शोधक पथकाकडून स्टेज व परिसराची तपासणी करण्यात आली. मराठा समन्वयकांनी पोलिसांच्या मदतीला स्वयंसेवकांची फौज उभी केली होती. मराठा समाजातील तरुणांनी स्वयंसेवक म्हणून कर्तव्य बजावले.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |