09:29pm | Sep 22, 2023 |
सातारा : बेडग, ता. मिरज, जि. सांगली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असणारी स्वागत कमान अज्ञातांकडून पाडण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने शुक्रवारी वाढेफाटा येथे उड्डाणपुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व अशोक बापू गायकवाड यांनी केले. या मोर्चामुळे सुमारे तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात होता.
बेडग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान पाडण्यात आल्याच्या घटनेचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठे पडसाद उमटले आहेत. या गावातील आंबेडकरप्रेमी अनुयायांनी आपली घरे बंद करून बेडग ते मुंबई असा लॉंग मार्च आयोजित केला आहे. हा लॉन्ग मार्च गुरुवारी रात्री कराडवरून साताऱ्यात दाखल झाला. शुक्रवारी सकाळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तीनशे आंदोलक चालत पुण्याच्या दिशेने निघाले. वाढे फाटा येथील उड्डाणपुलावर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रिपाईच्या आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या आणि कमान पाडणाऱ्या मनुवादी प्रवृत्तींचा निषेध केला.
या आंदोलनामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष प्रतीक गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष अण्णा वायदंडे, युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश गाडे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
हा साखळी मोर्चा पुणे जिल्ह्यातून रायगड जिल्हा करत मंत्रालयाकडे रवाना होणार आहे. सातारा जिल्ह्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मोठी परंपरा आहे. येथील आंदोलन सनदशीर मार्गाने आणि शांततामय पद्धतीने करण्याचे आवाहन यावेळी अशोक बापू गायकवाड यांनी करत या प्रकरणातील मनुवादी प्रवृत्तींचा निषेध केला. या आंदोलनामुळे महामार्गावर सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती.
साताऱ्याचे डीवायएसपी किरण कुमार सूर्यवंशी, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक अजित कोकाटे, पोलीस निरिक्षक विश्वजीत घोडके, धनंजय फडतरे तसेच सुमारे शंभर ते दीडशे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. महामार्गावरील वाहतूक सेवारस्त्याने या काळामध्ये वळवण्यात आली होती. अर्ध्या तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर आंदोलक पाचवडच्या दिशेने रवाना झाले.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |