सातारा : येथील श्यामसुंदरी चॅरिटेबल अँड रिलीजियस सोसायटीच्या के.एस. डी. शानभाग विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत यश मिळवले आहे. आता या खेळाडूंची निवड विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे. रायफल शूटिंग स्पर्धा म्हसवड येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरी माता हायस्कूल, म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांचे गटात ओपन साईट रायफल प्रकारात रितेश गिरिधारी लाल जांगिड याने सिल्वर मेडल तर अथर्व प्रवीण कुमार जगताप याने ब्रांझ मेडल मिळवले सतरा वर्षाखालील गटात ओपन साईट रायफल प्रकारात सर्वेश नितीन जोशी यांनी ब्रांझ मेडल तर 19 वर्षाखालील मुलांच्या गटात ओपन साईट रायफल प्रकारात अनुराज सुभाष पाटील यांनी सिल्वर तर आर्यन संभाजी गर्गे यांनी ब्रांझ मेडल मिळवले आहे .सतरा वर्षाखालील मुलांच्या एयर पिस्टल प्रकारात स्वयम बिपिन गायकवाड यांनी सुवर्णपदक मिळवले आहे आताही सर्व खेळाडू झोनल रायफल शूटिंग स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व खेळाडूंना शाळेचे वतीने आशिष सपकाळ यांनी प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.
या विशेष यशाबद्दल के.एस.डी .शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, विश्वस्त सौ.उषा शानभाग ,संचालिका सौ.आचल घोरपडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच पालक संघाचे प्रतिनिधी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या खेळाडूंना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |